गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त file photo
छत्रपती संभाजीनगर

Cattle Smuggling : अवैधरीत्या गोवंशांची वाहतूक करणारे दोघे ताब्यात

टेम्पोसह पाच गायी जप्त; ३ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Two arrested for illegally transporting cattle

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज प्राणिसंग्रहालयासमोर अवैधरीत्या गोवंशांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी गुरुवारी (दि. १३) दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच गायी आणि एक टेम्पो असा एकूण ३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुभाष गुलाब लोंढे (५५, रा. घोडेगाव, जि. अहिल्यानगर) आणि सय्यद समीर सय्यद रशीद (२४, रा. फैजपूर, जि. जळगाव) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अंमलदार उमेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एका टेम्पोतून गोवंशांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. त्यावरून उमेश चव्हाण, जमादार उमेश ठाकूर आणि होमगार्ड पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्राणिसंग्रहालयासमोर संशयास्पद उभ्या असलेल्या टेम्पोची (एम एच ११-बी एल-५७५७) पाहणी केली. यावेळी टेम्पोमध्ये पाच गायी दाटीवाटीने बांधलेल्या स्थितीत आढळल्या.

वाहनचालक सुभाष लोंढे आणि त्याचा सहकारी सय्यद समीर यांच्याकडे वाहतुकीबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ७७ हजार रुपये किमतीच्या पाच गायी आणि २ लाख ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण ३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गायींची गोशाळेत रवानगी

जप्त केलेल्या गायींची सुटका करून त्यांना एका महाविद्यालयाच्या गोशाळेत सुरक्षितरीत्या दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेगमपुरा पोलिस करत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT