Transfers of 15 Police Inspectors and four Assistant Inspectors
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर पोलिस दलात मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. १५ पोलिस निरीक्षक आणि चार सहायक निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून, मंगळवारी (दि.३० जून) बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. नव्याने दाखल झालेल्या निरीक्षकांना पूर्णवेळ ठाण्याचा प्रभार देण्यात आला आहे. यामध्ये पुंडलिकनगर, एमआयडीसी सिडको, वेदांतनगर, दौलताबादचा समावेश आहे. वाहतूक शाखांनाही नवे अधिकारी देण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांना मुकुंदवाडी ठाण्याचा पूर्णवेळ प्रभार देण्यात आला आहे.
४ सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या
गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे यांच्याकडे सिडको वाहतूक शाखेचा पदभार देण्यात आला आहे. डायल ११२ च्या जयश्री कुलकर्णी यांची बदली सिडको ठाण्यात करण्यात आली आहे. याशिवाय, सुरक्षा शाखेचे मदनसिंग घुनावत आणि सायबरचे कदीर देशमुख या दोघांची जिन्सी ठाणे तर सिडको वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांची मुकुंदवाडी ठाण्यात बदली करण्यात आली आहे.