Touching electric wires, highway, car burnt down
वैजापूर पुढारी वृत्तसेवा वैजापूर तालुक्यातील चोर वाघलगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास विद्युत तारेला स्पर्श झाल्यानंतर हायवा आणि स्विफ्ट कारला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच दोन्ही वाहने जळून खाक झाली.
रस्त्याच्या कडेला गेलेल्या हायवा वाहनाचा वरचा भाग विद्युत तारेला लागला. स्पार्क होऊन आग भडकली आणि हायवाबरोबरच शेजारी उभी असलेली स्विफ्ट कारही आगीत सापडली. क्षणात दोन्ही वाहने जळू लागल्याने परिसरात गोंधळ उडाला.
गावकऱ्यांनी व पोलिसांनी धाव घेत, अग्निशामक दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दोन्ही वाहने जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.