Three Gram Panchayats in the district win awards under the Panchayat Raj Campaign!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींनी पुरस्कार प्राप्त केले. जिल्हास्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार लाडगाव-हिवरा ग्रामपंचायतीने पटकावला. या ग्रामपंचायतीला ५० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
जरंडी ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवत ३० लाख, तर पाटोदा ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवत २० लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. शहरातील केंब्रिज स्कूल चौक मैदानावर गुरुवारी झालेल्या विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री योगेश कदम, मेघना साकोरे-बोर्डीकर, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, यांची प्रमुख उपस्थिती होती.
विभागस्तरीय पुरस्कारांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीने एक कोटींचा प्रथम पुरस्कार मिळविला. लातूरच्या आनंदवाडीला द्वितीय ८० लाखांचे, तर बीडच्या वंजारवाडी तृतीय ६० लाखांचे पारितोषिक मिळाले. यावेळी आमदार प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण, विलास भुमरे, इंद्रीस मुलतानी, जिल्हा परिषद अध्यक्ष गलांडे, सभापती सचिन कल्याण गायकवाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
अशी आहेत पुरस्काराची मानकरी गावे...
छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय पुरस्कार
1 प्रथम (५० लाख रुपये) लाडगाव-हिवरा ग्रामपंचायत
2 द्वितीय (३० लाख रुपये) जरंडी ग्रामपंचायत
3 तृतीय (२० लाख रुपये) : पाटोदा ग्रामपंचायत
विभागस्तरीय पुरस्कार
प्रथम (१ कोटी रुपये) दाटेगाव ग्रामपंचायत (जि. हिंगोली)
द्वितीय (८० लाख रुपये) : आनंदवाडी ग्रामपंचायत (जि. लातूर)
तृतीय (६० लाख रुपये) : वंजारवाडी ग्रामपंचायत (जि. बीड)