Three arrested for planning robbery
बिडकीन, पुढारी वृत्तसेवा :
डीएमआयसी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघाजणांना मोठ्या शिताफीने बिडकीन पोलिसांनी शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून घातक शस्त्र व दरोड्याचे साहित्य एक दुचाकी हस्तगत केले. शनिवारी दुपारी तिघाजणांविरुध्द बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिडकीन शेंद्रा डीएमआयसीमध्ये यापूर्वी कपंन्यांच्या आवारातून कच्चा माल वा वायर लोखंड चोरीच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवार रात्री सहायक पोलिस निरीक्षक शेळके हे पोलिस कर्मचऱ्यासह गस्तीवर होते. डीएमआयसी परिसरातील रोडच्या कडेला काही सशंयित महिला-पुरुष दिसताच पोलिसांनी त्यांची चौकशी केली.
पोलिसांना पाहून त्यांची भंबेरी उडाली. पोलिसांचा संशय बळावल्याने तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घातक शस्त्र व दरोड्याचे साहित्य हस्तगत करून चौकशीकामी अटक केली आहे. असलम मंजुर शेख (वय ३२ रा. चितेगाव), गणेश भाऊसाहेब तीतर (वय २५ रा. मुलानी वाडगाव), राजू भाऊसाहेब नजन (वय २७ रा. किनगाव ता. फुलंब्री, ह. मु. चितेगाव) अशी आरोपींची नावे आहेत.