Thousands of devotees had darshan of Karnapura Devi
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराची ग्रामदेवता, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्णपुरा येथील तुळजाभवानी देवी मंदिरात पाचव्या माळेनंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. रविवारी (दि.२८) सुटीच्या दिवशी सातव्या माळेला दर्शनासाठी हजारो भक्तांची गर्दी झाली. कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसातही भाविकांच्या मंदिरासमोर रांगा दिसल्या. यात्र ोत्सवाला मात्र पावसाचा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कर्णपुरा देवी प्रसिद्ध असून, येथील यात्रेला ४०० वर्षांचा इतिहास आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या काळात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात, नवसाला पावणारी देवी म्हणून देवीची ख्याती आहे. हजारो भाविक नवर-ात्रीच्या काळात नवस फेडण्यासाठी येत असतात. पाचव्या माळेनंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे.
शनिवारी संध्याकाळपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस वसरला. या पावसातही कर्णपुरा मंदिरात उत्साही भक्तांची दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. रविवारी सकाळी उघडल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली. यात महिला भक्तांची संख्या लक्षणीय होती. दिवसभर गर्दीचे चित्र होते. संध्याकाळपर्यंत हजारो भक्तांनी देवीचे दर्शन घेतले.
कर्णपुरा यात्रेनिमित्त परिसरात लागलेल्या जत्रेला पावसाचा फटका बसला. सलग सुरू असलेल्या पावसामुळे व्यावसायिकांना निराश केले. रविवारी सुटीच्या दिवशी येथील रहाटपाळणे, विविध वस्तू खरेदीची दुकाने हॉटेल्समध्ये ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. अनेक जण सहकुटुंब येऊन देवीचे दर्शन घेत यात्रेचा आनंद लुटला. मात्र अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.