Chhatrapati Sambhajinagar : १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्याला लगेच मिळणार दिलासा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्याला लगेच मिळणार दिलासा

अधिक युनिटसाठी तीन वर्षांनंतर मिळणार सवलत

पुढारी वृत्तसेवा

Those who use up to 100 units of electricity will get immediate relief

जे.ई. देशकर

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील वीज ग्राहकांसाठी टप्प्याटप्प्याने सुमारे २६ टक्के वीज दर कमी करण्याचे घोषित केले आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार २०२५ ते २०३० या पाच वर्षांत घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांचे वीज दर कमी करण्याचे सांगितले असले, तरी तूर्त केवळ १ ते १०० युनिटपर्यंत वीज वापर करणार्याला १ जुलैपासून दिलासा मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त वापर करणार्याला मात्र दोन किंवा तीन वर्षे तरी वाट पाहावी लागणार आहे.

नुकतीच वीज दरवाढ कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सवलत १ जुलैपासून दिली जाणार आहे. यात १ ते १०० युनिटपर्यंत ज्यांचा वापर आहे, त्यांना दिलासा मिळणार आहे.

एक जुलैपासून त्यांना प्रतियुनिट ६ रुपये ३२ पैशा ऐवजी प्रतियुनिट ५ रुपये ७४ पैसे मोजावे लागणार आहेत. तर १०१ ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्याला १२ रुपये २३ पैशाच्या जागी १२ रुपये ५७ पैसे, तर ३०१ ते ५०० युनिटच्या ग्राहकांसाठी १६ रुपये ७७ पैशांऐवजी १६ रुपये ८५ पैसे. तसेच ५०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्यांना १८ रुपये ९३ पैशांऐवजी १९ रुपये १५ पैसे मोजावे लागणार आहेत. म्हणजे १०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या तूर्त तरी दिलासा नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT