They kidnapped and confined their sister for the sake of property.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हक्क सोड प्रमाणपत्र लिहून घेण्यासाठी दोन सख्या भावांनी आपल्याच बहिणीचे अपहरण करून तिला डांबून ठेवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एमआयडीसी चिकलठाणा भागातील अमर कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये सोमवारी (दि.२२) रात्री हा प्रकार घडला. दरम्यान, पोलिसांनी पीडितेची सुटका केली आहे.
अमोल नारायण तांदळे (३३), सुदाम नारायण तांदळे (३८, दोघेही रा. गणोरी, फुलंब्री) आणि भावजी सुरेश दादाराव जाधव (रा. सावंगी) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी सोनाली (३५) यांच्या तक्रारीनुसार, त्या मुलीसह राहतात. ऑनलाईन बिजनेस करून उदर्निवाह करतात. घरी एकट्या असताना त्यांचा भाऊ आणि भावजी यांनी येऊन शिवीगाळ करून वडिलांना भेटायला खाली चल, ते गाडीत बसले आहेत असे सांगितले. त्यामुळे सोनाली कारजवळ गेल्या. दरवाजा उघडून पाहिले तर आत कोणीही नव्हते.
आरोपींनी त्यांना गाडीमध्ये जबरदस्तीने बसविण्याचा प्रयत्न केला. सोनाली यांनी आरडाओरड सुरू करताच मोठा भाऊ सुदामने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. गाडीमधून त्यांना गणोरी येथे वडिलांच्या शेतात घेऊन गेले. आर- ोपींनी सोनाली यांना मंगळवारी रात्रीपर्यंत गाडीतच बसवून ठेवले आणि त्यानंतर जटवाडा रोडवरील एका आतेभावाच्या घरी नेऊन डांबले. तिने भावाला याबाबत वारंवार विचारले परंतू त्यांनी तिला सोडले नाही.
वडिलोपार्जित संपत्तीत हक्क सोड प्रमाणपत्र लिहून दे, अन्यथा तुझ्या ओळखीच्या व्यक्तीला आणि तुला बघून घेऊ. तुझ्या मुलीला तुझ्या पहिल्या पतीकडे सोडून देऊ, अशी धमकी आरोपींनी दिली.
दामिनी पथकाने केली सुटका
बुधवारी सोनाली यांनी शेजारच्या महिलेच्या फोनवरून ओळ-खीच्या एकाला मदत मागितली. त्यांनी दामिनीच्या पीएसआय कांचन मिरघे यांचा नंबर देताच सोनाली यांनी मिरघे यांना लोकेशनसह मदतीचा मॅसेज पाठवला. रात्री साडेदहाच्या सुमारास महिला पोलिसांनी त्यांची डांबून ठेवलेल्या ठिकाणाहून सुटका केली. सोनाली यांनी एमआयडीसी सिडको ठाणे गाठून तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.