चोरीची दुचाकी सोडून पळाले, पोलिसांनी त्याच दुचाकीने पाठलाग करून पकडले file photo
छत्रपती संभाजीनगर

चोरीची दुचाकी सोडून पळाले, पोलिसांनी त्याच दुचाकीने पाठलाग करून पकडले

पैठणगेट भागात वाहतूक पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

They fled on a stolen bike, but the police chased them on the same bike and caught them

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधान व धाडसामुळे एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, चोरीची दुचाकी सोडून पळणाऱ्या आरोपींचा पाठलाग करण्यासाठी पोलिसांनी त्याच दुचाकीचा वापर करत एकाला फिल्मी स्टाईलने जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी (दि.७) दुपारी २:३० वाजेच्या सुमारास पैठणगेट भागात करण्यात आली.

राहुल रमेश लाटे (२२, रा. शत-ाब्दीनगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. शहर वाहतूक शाखा २ चे सहायक निरीक्षक सुनील क-हाळे यांच्या आदेशाने ग्रेड पीएसआय बोडेले, हवालदार दुल्हत, अंमलदार धर्मे हे पैठण गेट ते बारा भाई ताजियादरम्यान नो एन्ट्रीमध्ये येणाऱ्या वाहनांवर कारवाई करत होते. यावेळी एका दुचाकीवर दोन तरुण संशयास्पदरीत्या येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, कारवाईच्या भीतीने आणि गुन्ह्याच्या धास्तीने दोन्ही तरुण दुचाकी तेथेच टाकून पळू लागले. क्षणाचाही विलंब न लावता हवालदार दुल्हत आणि अंमलदार धर्मे यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.

आरोपींनी रस्त्यावरच सोडून दिलेल्या त्याच प्लॅटिना दुचाकीचा ताबा घेत, अंमलदारांनी तिचा वापर करून पळणाऱ्या दोघांचा पाठलाग केला. भागात गजबजलेल्या झालेल्या या फिल्मी पाठलागानंतर पोलिसांनी राहुल लाटे याला पकडले, तर त्याचा दुसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. दुचाकीवरील नंबर बनावट व दुचाकीही चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी राहुल लाटे याला क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT