रुग्णसेवेसारखे दुसरे पुण्य नाही : पालकमंत्री file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : रुग्णसेवेसारखे दुसरे पुण्य नाही : पालकमंत्री

घाटीतील ट्रॉमा केअर सेंटर, वॉर्ड २९ चे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

There is no act of merit greater than serving the sick: Guardian Minister

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घाटी चांगली व्हावी, नावारूपाला यावी, यासाठी नेहमीच सहकार्याची भूमिका आहे. १० रस्ते चांगले केले तर नाव होत नाही. मात्र एखादा गंभीर आजारी रुग्ण बरा झाला तर त्याचे आशीर्वाद त्यापेक्षा मोठे असतात. त्यामुळे रुग्णसेवेसारखे पुण्य नाही. अशा शब्दांत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी डॉक्टरांच्या कार्याचे कौतुक केले.

घाटी रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर आणि प्रसूती विभागाच्या वॉर्ड २९ चे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अभ्यागत समिती अध्यक्ष आ. प्रदीप जैस्वाल, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपाधिष्ठाता डॉ. गायत्री तडवळकर, नगरसेविका हर्षदा शिरसाट, डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. विनोद मुंदडा, डॉ. सोनाली देशपांडे यांच्यासह वरिष्ठ डॉक्टर्स, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे शिरसाट म्हणाले, कोणतेही पद कायम टिकणारे नाही. त्याची चिंता कशाला करायची. त्यापेक्षा आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांचे समाधान महत्वाचे आहे. पेशंटशी निगडित सुविधांसाठी नेहमीच सहकार्य आहे. रुग्णालयात ३०-३० पंखे चालू असूनही उकाडा सहन करावा लागत असेल, तर या ऊर्जेचा वापर करून रुग्णालयच वातानुकूलित असू शकतो ? केवळ आयसीयू वॉर्डमध्ये एसी आणि बाकी रुग्णालयात रुग्ण उकाड्याने त्रस्त, असल्या अर्धवट सुधारणा आम्हाला नको आहेत. एसीमुळे रुग्णांच्या शरीरावर होणाऱ्या इतर वातावरणीय प्रक्रिया आणि इन्फेक्शनही रोखता येते, असेही नमूद केले.

२५ कोटींच्या मशीनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

घाटीमध्ये पक्षाघाताच्या (पॅरालिसिस) रुग्णांवर तातडीने व मोफत उपचार व्हावेत यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांची अत्याधुनिक यंत्रसामग्री (मशीन) मंजूर करण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत ही मशीन रुग्णालयात दाखल होईल. या ऐतिहासिक कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अत्यंत भव्य स्वरूपात केले जाईल, असेही पालकमंत्र्यांनी जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT