Sambhajinagar 40,000 beneficiaries of PM Awas
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
प्रधानमंत्री आवास योजनेतून महापालिका गरजूंना अल्प किमतीमध्ये घरे तयार करून देत आहे. यासाठी महापालिकेला प्राप्त झालेल्या अजपैिकी तब्बल ४० हजार लाभार्थी पात्र ठरले आहेत. मात्र घरांची संख्या ११ हजार असल्याने लवकरच लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू होणार असून, या ऑनलाईन प्रक्रियेसाठी महापालिकेने खासगी एजन्सी निश्चित केली आहे.
देशातील बेघर नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री आवस योजना सुरू केली. या योजनेत महापालिकेने गरजूंसाठी गृहप्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हा प्रशसानाकडून जागा घेतली. यात शहरालगत तीसगाव येथे २ प्रकल्प तसेच पडेगाव, सुंदरवाडी आणि हसूल येथे प्रत्येकी एक असे ५ गृहप्रकल्प होणार आहेत.
या प्रकल्पाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. बहुमजली इमारती बांधून त्यात ५ प्रकल्पांमध्ये ११ हजाराहून अधिक सदनिका तयार केल्या जाणार आहेत. या योजन-`साठी तब्बल ९ वर्षांपूर्वी लाभार्थीकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यातील ४० हजार लाभार्थी पात्र ठरले होते. मात्र तेवढ्या सदनिका उपलब्ध नसल्याने महापालिकेने ड्रॉ पद्धतीने निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
लाभार्थी निवडीसाठी प्रशासनाने खासगी एजन्सीची निवड केली आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन होणार असून, एजन्सीला लवकरच कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत.
महापालिकेच्या गृहप्रकल्पांतील लाभार्थीची निवड ही म्हाडा आणि सिडकोच्या ड्रॉ पद्धतीप्रमाणेच होणार आहे. त्यामुळे या दोन्हीकडे काम केलेल्या एजन्सीलाच महापालिकेने या सदनिकांच्या लाभार्थी निवडीसाठी नियुक्त केले आहे. म्हाडा, सिडकोच्या कामाचा त्यांच्याकडे अनुभव असल्याने प्रक्रिया पारदर्शकपणे होईल, असा विश्वास मनपाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.