The thieves stole the bullet from the parking lot of the house
गारखेडा परिसरातील भारतनगर येथे रा हणाऱ्या गणेश शिंदे (५३) यांची घराच्या पार्किंगमध्ये हँडल लॉक केलेली बुलेट चोरट्यांनी २३ ऑगस्टच्या रात्री पळवली. वाहन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, या प्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात वाहन चोरट्यांनी उच्छाद मांडला असून आता त्यांची मजल चक्क घरातील पार्किंगपर्यंत गेली आहे. गारखेडा परिसरातील भारतनगरमध्ये राहणाऱ्या गणेश शिंदे यांच्या घरातील पार्किंगमधून दोन चोरट्यांनी २३ ऑगस्ट रोजी रात्री काळ्या रंगाची बुलेट (क्र.एम एच-२० एफ टी-९९८८) हँडल लॉक करून घराच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. २४ ऑगस्ट रोजी सकाळी गाडी जागेवर नसल्याने त्यांनी परिसरात गाडीचा शोध घेतला. दरम्यान दोन्ही वाहन चोरटे त्यांच्या घरी लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध घेणे सुरू केला आहे.