Crime News : एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

कन्नड तालुक्यातील घटना, साडेबारा लाख सुरक्षित

पुढारी वृत्तसेवा

The thieves' attempt to break into the ATM failed

कन्नड, पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील चापानेर येथील कन्नड-वैजापूर राज्य महामार्गावरील बसस्थानक परिसरातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. रविवारी (दि.४) पहाटे सव्वादोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तब्बल एक तास प्रयत्न करूनही चोरट्यांना यश आले नाही.

चापानेर बसस्थानकावरील बंद असलेल्या एटीएम रूमच्या शटरचे कुलूप गॅस कटरने तोडून तीन चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र मशीन न उघडल्याने त्यांचा डाव फसला. एटीएममधील १२ लाख ७० हजार ९०० रुपये सुदैवाने सुरक्षित राहिले.

रविवारी सकाळी दहा वाजता एटीएम उघडण्यासाठी कर्मचारी योगेश भाडाईत आले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ संबंधितांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण श्वान पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उस्मान पठाण, पोलिस उपनिरीक्षक अमोल जाधव, अंगुलीमुद्रा तज्ज्ञांचे पथक तसेच बीट जमादार संदीप कनकुटे यांनी पाहणी केली.

या प्रकरणी भारतीय स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक मंगेश थोरात यांनी ग्रामीण पोलिसठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दोन वर्षांपूर्वी लंपास केले होते २२ लाख

जानेवारी २०२४ साली हेच एटीएम चोरट्यानी फोडून २२ लाख रुपायांची रक्कम लंपास केली होती. आता दोन वर्षांनंतर चोरट्यांनी परत याच एटीएम मशीनला लक्ष केले आहे. अशा पध्दतीने पुन्हा चोरीचा प्रयत्न झाल्याने या ठिकाणी सुरक्षा वाढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT