The Taj of the Deccan, also known as Bibi Ka Maqbara, is falling into disrepair due to lack of maintenance and repairs.
अतुल खंडगावकर
छत्रपती संभाजीनगर : मुघल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दख्खनचा ताज अर्थात बीबीका मकबऱ्याची देखभाल, दुरुस्तीअभावी दुरवस्था होत आहे. शुभ्र संगमरवरी दगडात बांधकाम करण्यात आलेल्या मकबऱ्याच्या मागील बाजूची भिंत, मीनारच्या स्लॅबचा काही भाग ढासळला असून, मीनार, भिंतीचा काही भागही काळवंडला आहे.
हा ऐतिहासिक मकबरा औरंगजेब याचा पुत्र आजम शाह याने आपली आई दिलरास बानो बेगमच्या स्मरणार्थ १६६०-१६६१ मध्ये बनवला आहे. याला दख्खनचा ताज किंवा मिनी ताज असेही म्हणतात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला पाहण्यास आलेले पर्यटक आवर्जून बीबीका मकबरा पाहण्यासाठी येतात. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे दख्खनच्या ताजमहल असलेल्या बेबी का मकबराची आज दुरवस्था झाल्याचे पहावयास मिळत आहे. मकबऱ्याच्या मागील बाजूस असलेल्या घुमटाच्या स्लॅबचा काही भाग ढासळला आहे. मीनार, तसेच मकबऱ्याचा काही भाग काळवंडला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची येथे कुठलीही व्यवस्था नाही.
प्रेमवीरांकडून विद्रुपीकरण
या ऐतिहासिक स्थळांत प्रेमवीरांचा मुक्त संचार असतो. यांच्याकडून प्रेमाच्या नावाखाली मकबऱ्याचे सौंदर्य विद्रुप केले जात आहे. अनेकांनी भिंतींवर स्वतःची व आपल्या प्रेयसींची नावे व हृदयाची चिन्हे कोरली आहेत. शेकडो वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या भिंतींवर, दगडांवर नावे कोरल्याने मकबऱ्याचे मूळ स्वरूप धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिक व इतिहासप्रेमींनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
ऐतिहासिक स्थळांचा आदर करावा ऐतिहासिक स्थळांत स्वच्छता राखणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मकवऱ्याच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. मकबऱ्याचे सौंदर्य विद्रुप करणाऱ्या प्रेमवीरांवर कडक कारवाई केली जाईल.- शिवकुमार भगत, अधीक्षक, पुरातत्व विभाग
प्रेमवीरांवर कारवाई करावी 6 अनेक प्रेमवीर आपले भान विसरून ऐतिहासीक स्थळांचे सौंदर्य धोक्यात आणत आहेत. अशांवर पुरातत्व विभागाने कडक कारवाई करावी, हा उज्ज्वल वारसा सुरक्षित ठेवायचा असेल, तर जनजागृती आणि कठोर कायदे ही दोन्ही साधने प्रभावीपणे वापरणे आवश्यक आहे.- प्रा. डॉ. संजय गायकवाड, (इतिहासप्रेमी तथा शिवचरित्र अभ्यासक)
वेळीच उपाययोजना आवश्यक विदेशी पर्यटक काळवंडलेला आणि पडझड झालेला बीबीका मकबरा पाहून काय विचार करत असतील. आपली अबू वेशीवर टांगण्याआधीच उपाययोजना करून बीबीका मकबऱ्याचे गतवैभव मिळवणे आवश्यक आहे.बाळासाहेब