पालकमंत्र्यांच्या हस्ते सुक्रे पॅटर्नच्या उत्कर्षगाथाचे विमोचन file photo
छत्रपती संभाजीनगर

पालकमंत्र्यांच्या हस्ते सुक्रे पॅटर्नच्या उत्कर्षगाथाचे विमोचन

अधिष्ठाता पदाची यशस्वी द्वितीय वर्षपूर्ती, विकासकामांचा लेखाजोखा

पुढारी वृत्तसेवा

The story of the Sucre pattern was released by the Guardian Minister

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा घाटीचा वैद्यकीय विद्यार्थी ते याच संस्थेचे प्रमुख म्हणजेच अधिष्ठाता पदापर्यंत पोहोचलेले अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी नुकतेच २० डिसेंबर रोजी आपल्या कार्यर्कीदीचे यशस्वी दोन वर्षे पूर्ण केली.

या कार्यकाळात त्यांनी घाटीत केलेल्या सर्वांगीण विकासकामांचा लेखाजोखा उत्कर्षगाथामध्ये मांडण्यात आला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शनिवारी (दि.२१) या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. याचवेळी चिठ्ठीमुक्त घाटीनंतर आता कचरामुक्त घाटी करण्याचा निर्धार डॉ. सुक्रे यांनी केला.

या उत्कर्षगाथेत प्रत्येक विभागातील आमूलाग्र बदलांसह अनेक कामांचा आढावा घेऊन रुग्णसेवा भक्कम करण्याचे प्रयत्न शब्द रूपाने सचित्र उमटले आहे. यासह कर्करोग रुग्णालय, एसएसबी, मेडिसिन बिल्डिंग, महाविद्यालय आणि रुग्णालय येथे सुरू असलेल्या कामांची माहिती पुस्तिकांमधून सर्वांसमोर उलगडली आहे.

पुस्तिकेसाठी मुख्य संपादक म्हणून नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना पाटील वरे यांनी जबाबदारी पार पाडली. तर उपअधिष्ठाता विनोद मुंदडा, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. शिल्पा आ-सेगावकर, डॉ. शैलेजा राव, डॉ. शिल्पा पवार, डॉ. स्वप्ना आंबेकर, डॉ. अनिता कंडी, डॉ. तपन जक्कल, डॉ. महावीर नाकेल, डॉ. सरोश सय्यद, डॉ. मोहन मोरखडे, छायाचित्रकार सुजीत खिल्लारे, नयना फटकाळ यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT