अजिंठा लेणीतील सुप्रसिद्ध सप्तकुंड धबधबा धो-धो कोसळू लागला Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

अजिंठा लेणीतील सुप्रसिद्ध सप्तकुंड धबधबा धो-धो कोसळू लागला

पुढारी वृत्तसेवा

फर्दापूर : पुढारी वृत्तसेवा

सोयगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात (रविवार) रात्रभर व आज (सोमवार) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील वाघूर नदीला मोठा पूर आला आहे. यामुळे अजिंठा लेणीतील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला सप्तकुंड धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे.

यामुळे पावसाळी पर्यटन हंगामात अजिंठा लेणी सफरीवर येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक विशेष पर्वणीच ठरणार आहे. या धबधब्‍याचे विहंगम दृष्‍य पर्यटकांचा अजिंठा लेणी सफरीचा आनंद द्विगुणित करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT