The polling station-wise voter list will be published today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करून १२६४ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. आज शनिवारी (दि. २७) मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून, मतदारांनी आपली नावे यादीमध्ये शोधून घ्यावीत, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून, मनपा प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार शहरात ११ लाख १८ हजार २८३ मतदार संख्या आहे. या मतदारांना २९ प्रभागांतील ११५ सदस्यांना निवडून द्यावे लागणार आहे.
२९ प्रभागांसाठी ३६३ इमारतींमध्ये एकूण १२६४ मतदार केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. मतदान केंद्राबद्दल आक्षेप नोंदविण्यात येत असून, त्यामध्येही थोडेफार बदल होण्याची शक्यता आहे. साधारणपणे ८०० ते ९०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे.