छत्रपती संभाजीनगर

आठ महिन्यांची तगमग संपली, मुलाला पाहताच आईच्या डोळ्यात अश्रू

पोलिसांमुळे झाली भेट.

पुढारी वृत्तसेवा

The police reunited a mother and her young son after a gap of eight months

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पाचोड (ता. पैठण) पोलिसांनी एका आई आणि भोळसर तरुण मुलाची भेट तब्बल आठ महिन्यांनंतर घडवून आणली आहे. मुलाला पाहताच आईला अश्रू अनावर झाले.

दरम्यान, हा तरुण हा गेल्या आठ महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध पोलिस घेत होते. हा तरुण एक दिवस घरातून बाहेर गेला होता, परंतु तो घरी परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी केला, पण तो सापडत नव्हता. त्याला शोधण्याचा प्रचंड खटाटोप पाचोड येथील बालाजीनगर भागातील स्थानिक नागरिकांनी गुरुव ारी (दि.२) संध्याकाळी नऊ वाजता एका युवकास चोर समजून पाचोड पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

त्यावेळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, पोलिस उपनिरीक्षक राम बारहाते, पोलिस हवालदार साबळे यांनी युवकाची विचारपूस केल्यानंतर सदर तरुण भोळसर असल्याचे लक्षात आले. संतोष चंदू मानवतकर असे युवकाचे नाव असल्याचे समोर आले.

पोलिसांनी सोशल मीडियाच्या मदतीने सर्व जिल्ह्यातील व्हॉट्सॲप ग्रुपवर त्याची माहिती पाठवण्यात आली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने युवकाची आई लताबाई चंदू मानवतकर (रा. वाल्मीकनगर, वाशीम) यांनी पाचोड पोलिस ठाण्यात येऊन युवक त्यांचा मुलगा असल्याचे सांगितले. पाचोड पोलिस ठाणे येथे साबळे यांनी संतोष चंदू मानवतकर यास त्याच्या आईच्या ताब्यात दिलेले आहे.

संतोष हा मूळचा वाशीम शहरातील राहणारा असून, त्याच्या मानसिकतेमध्ये बदल झाल्यामुळे तब्बल आठ महिन्यांपूर्वी तो अचानक घरातून बाहेर पडला होता. त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते, परंतु त्यांना संतोष याचा शोध घेण्यास यश मिळत नव्हते. पाचोड पोलिसांनी संतोष व त्याच्या आईची भेट झाली केलेल्या प्रयत्नाला यश आल्याने आहे. संतोषची आई लताबाई यांना मुलास पाहून अश्रू अनावर झाले. त्यांनी पाचोड पोलिसांचे मनापासून आभार मानले. दरम्यान, संयम, तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि मानवी संवेदना यांच्या आधारे एका कुटुंबाला पुन्हा एकत्र आणणाऱ्या पोलिस दलाचे नागरिकांकडून कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT