Drug Case : नशेचा बाजार करणाऱ्या अंधा फिरोजची काढली धिंड File Photo
छत्रपती संभाजीनगर

Drug Case : नशेचा बाजार करणाऱ्या अंधा फिरोजची काढली धिंड

या दोघांना एनडीपीएसच्या पथकाने बेड्या ठोकून ३१ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या होत्या.

पुढारी वृत्तसेवा

The police Andha Firoz who was involved in the drug trade.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जेलमधून सुटताच पुन्हा नशेचे सिरप विक्रीचा गोरखधंदा सुरू करणाऱ्या सय्यद फेरोज सय्यद अकबर ऊर्फ अंधा फेरोज (३०, रा. पडेगाव) आणि त्याचा पेडलर अयान शेख चांद शेख (१९, रा. वेदांतनगर) या दोघांना एनडीपीएसच्या पथकाने बेड्या ठोकून ३१ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या होत्या.

त्या दोघांची एनडीपीएसच्या पथकाने येथेच्छ धुलाई केली. त्यानंतर छावणी परिसरात बुधवारी (दि.१०) धिंड काढली. यावेळी एनडीपीएस पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रवीकांत गच्चे आणि छावणी पोलिसांनी त्याला चांदमारी, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी आदी भागात पायी फिरवून गुडघ्यावर आणून माज उतरविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT