पोलिस पुत्राच्या कुख्यात गँगचा निराला बाजार भागात राडा file photo
छत्रपती संभाजीनगर

पोलिस पुत्राच्या कुख्यात गँगचा निराला बाजार भागात राडा

पानटपरी चालकाला पिस्तूल रोखून लुटले, तिघांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या.

पुढारी वृत्तसेवा

The notorious gang of a policeman's son caused a disturbance in the Nirala Bazaar area

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील गजबजलेल्या निराला बाजार परिसरात एका पानटपरी चालकाला पोलिस पुत्राच्या कुख्यात गंगने पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास घडला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, गुन्हे शाखेने तिघांना बेड्या ठोकल्या आहे.

जय कन्हैय्या भांडारकर (२३, रा. मोदीखाना, जालना), रितेश पारस पहाडिया (२५, रा. कुंवारफल्ली, राजाबाजार) आणि करण गणेश तांदळे (२६, रा. कुंभारवाडा) अशी अटकेतील तर साहिल चांडक (२८, रा. औरंगपुरा) असे फरार आरोपीचे नाव असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सोमवारी (दि.२) दिली. तिघांना ४ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष रामेश्वर काष्ठे (२४, रा. चौरहा) यांची निराला बाजार येथील अशोका रेस्टॉरंटच्या बाजूला जयभवानी पान सेंटर नावाची टपरी आहे. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आशिष आपल्या दुकानावर असताना त्यांच्या ओळखीचा आरोपी करण तांदळे हा जय भांडारकर आणि रितेश पहाडिया यांच्यासह मोपेडवरून (एमएच-२० जीजे १०५१) तेथे आला. करण तांदळे याने त्याचा मित्र साहिल चांडक याला फोन लावून आशिषशी बोलणे करून दिले. साहिलने फोनवरून आशिषला करणला ५ हजार रुपये आणि दुकानातील सिगारेट दे, अशी धमकी दिली.

दोन वर्षांपूर्वी पदमपुऱ्यातही धुमाकूळ

जालना येथील कुख्यात गुन्हेगार जय भांडारकर हा पोलिस पुत्र असून, त्याच्याविरुद्ध दरोडा, लूटमार, जीवघेणा हल्ला यासह अनेक गंभीर 1 स्वरूपाचे गुन्हे जालना येथे दाखल आहेत. भांडारकर आणि रितेश पहाडिया दोघांनी एप्रिल २०२४ रोजी पदमपुऱ्यात मध्यरात्री मैत्रिणीला कोणी त्रास दिला, असे म्हणत एका तरुणाच्या डोक्याला पिस्तूल लावले तर दुसऱ्याच्या गळ्याला चाकू लावून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. दोघे कुख्यात गुन्हेगार आहे. तर तांदळे हा पॅथॉलॉजी लॅबवर काम करतो, मात्र या गुन्हेगारांसोबत तोही नशेखोरी, गुन्हेगारीच्या मार्गावर गेल्याचे सूत्रांनी

पिस्तूल आणि चाकूचा धाक

मारहाण सुरू असतानाच करण तांदळे याने स्वतःकडील चाकू काढला, तर जय भांडारकर याने पिस्तूल काढून आशिषच्या पोटाला लावली. जर पैसे आणि सिगारेट दिली नाही तर तुला जिवंत मारून टाकू, अशी धमकी देऊन त्यांनी आशिषला बाजूला ढकलले. त्यानंतर आरोपींनी टपरीच्या गल्ल्यातील ७ हजार रुपयांची रोकड आणि ६ हजार रुपये किमतीचे सिगारेटची पाकिटे असा १३ हजारांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. दरम्यान, हा प्रकार पैशाच्या वादातून झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे

पुंडलिकनगर गोळीबारातील कनेक्शन

काही दिवसांपूर्वी मनपा सफाई कामगाराच्या घरावर गोळीबार करणाऱ्या गंगमधील अमर पवार याने जय भांडारकर याला पिस्तूल दिल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे. अमर सध्या हसूल कारागृहात कैद आहे. मात्र यापूर्वीही त्याने अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पिस्तूल पुरविल्याचे प्रकार समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT