Railway News : जून २०२७ पर्यंत पूर्ण होणार रेल्वेची नवी इमारत Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Railway News : जून २०२७ पर्यंत पूर्ण होणार रेल्वेची नवी इमारत

विविध कामांचा डॉ. कराडांनी घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

The new railway building will be completed by June 2027

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : माजी खा. डॉ. भागवत कराड यांनी रेल्वेच्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि.९) रेल्वे अधिकारी आणि काही रेल्वे संघटनांच्या पदाधिकार्यांसोबत बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. यात रेल्वेस्थानकाची नवी इमारत जून २०२७ मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कराड यांना दिली.

बैठकीत डॉ. कराड यांनी नवीन इमारतीच्या कामांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. यात या इमारतीचे काम जून २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. यावर सुमारे एक एकरचा रूप टॉप कव्हर असणार आहे.

पहिल्या मजल्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स, फूड प्लाझा, मुलांसाठी गेम्स, तसेच प्रवाशांच्या आरामासाठी लक्झरी रूम्स आदी सुविधा राहतील. तसेच या रेल्वेस्थानकात चार फ्लाय ओव्हर ब्रिज, पाच प्लॅटफॉर्म राहणार असल्याचीही माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

नवीन रेल्वे मार्गाबाबत चर्चा

या बैठकीत छ. संभाजीनगर-पुणे, चाळीसगाव-छ. संभाजीनगर, छ. संभाजीनगर-बीड, धाराशिव या नवीन रेल्वे मार्गाबाबत सविस्तर चर्चा रेल्वे बोर्डातील डेप्युटी डायरेक्टर कृष्णकांत यांच्याशी झाली. या बैठकीसाठी मराठवाडा रेल्वे कृती समितीतर्फे अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर, विजय जयस्वाल, सरदार हरीसिंग, संजय पवार, राजकुमार सोमानी, विकी राज पाटील, तसेच रेल्वेतर्फे प्रशांत स्वामी, ब्रिजेश कुमार, दिनेश कुमार व रोहन भोयर आदी अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT