The mayoral posts of Chhatrapati Sambhajinagar and Parbhani are reserved for the open category
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी महापालिका वगळता नांदेड, लातूर, जालना येथे महापौरपदी महिला विराजमान होणार आहेत. मुंबई येथे गुरुवारी झालेल्या सोडतीत संभाजीनगर खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने भाजपचा महापौर सत्तासूत्रे सांभाळणार हे स्पष्ट झाले.
लातूरचे महापौरपद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. महापालिकेच्या १३ वर्षाच्या इतिहासात अनुसूचित जाती प्रवर्गाला पहिल्यांदाच हे आरक्षण मिळाल्याने, या प्रवर्गातील महिला सहावी महापौर राहील. या वर्गातील पाच नगरसेविका असल्याने आ. अमित देशमुख हे कोणाला संधी देणार याविषयी उत्सुकता आहे.
सन २०१५ ते २०२२ या काळात नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे महापौरपद वेगवेगळ्या प्रवर्गातील पाच महिलांनी भूषविल्यानंतर नव्या सभागृहातही पुढील अडीच वर्षे या मनपात महिला राज कायम रा हणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. भाजपाच्या पहिल्या महापौरपदाचा मान सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेकडे जाणार असून त्यासाठी पक्षाकडे तब्बल १२ नगरसेविका आहेत. मनपातील भाजपाचे निर्वाचित नगरसेवक विभागीय आयुक्त कार्यालयातील गटनोंदणीच्या प्रक्रियेसाठी गुरुवारी छ. संभाजीनगरकडे जात असताना महापौरपदाचा प्रवर्ग निश्चित होताच सर्वाधिक आनंद झाला तो, महेश मंचकराव खोमणे यांना. त्यांनी पत्नी दुसऱ्यांदा नगरसेविका झाली असून त्या महापौरपदाच्या प्रबळ दावेदार होणार आहेत.
परभणीचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्याने शहराच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. परभणीत शिवसेना (उबाठा) २५, काँग्रेस १२, भाजप १२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ११, जनसुराज्य शक्ती ३, यशवंत सेना १ तर १ अपक्ष सदस्य निवडून आले आहेत. या संख्याबळामुळे महापौर पदावर कोणाचा दावा असेल, याकडे सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागले होते. दरम्यान शिव-सेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्याने या आघाडीचे संख्याबळ स्पष्ट बहुमताच्या पुढे गेले आहे. त्यामुळे महापौर पदावर शिवसेना (उबाठा) दावा करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जालन्यात महापौर पदावर अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे. रूपा कुरील, रिमा खरात, वंदना मगरे, श्रद्धा साळवे यापैकी एका महिलेला संधी मिळणार आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदाची आरक्षणाची सोडत गुरुवारी काढण्यात आली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबईलगतच्या नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि पुणे, नाशिक, नागपूरमध्येही सर्वसाधारण गटातील महिला महापौरपदी विराजमान होणार आहे. तर, कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण ओबीसी गटासाठी राखीव झाले आहे.
इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवणार महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहेत. भाजपकडे सुमारे १० हून अधिक आहेत. त्यामुळे प्रत्येक इच्छुकांची नावे आता प्रदेशाध्यक्षांकडे सादर केली जाणार आहेत. प्रदेश पदाधिकारीच यातून महापौर पदाचे नाव जाहीर करतील.किशोर शितोळे, शहर जिल्हाध्यक्ष, संभाजीनगर
संभाजीनगरात भाजपमधून ११ जण इच्छुक
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे सवचिच लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी मुंबईत ही सोडत प्रक्रिया पूर्ण झाली. यात संभाजीनगर महापालिकेचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून या सोडतीनंतर सत्ता स्थापनेसाठी प्रबल दावेदार असलेल्या भाजपकडून ११ जण इच्छुक असल्याचे समोर आले आहे. सेवक असून त्यांनी सत्ता स्थापन्यासाठी तयारी सुरू केली आहे. केवळ महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडेच भाजपचे यंदा भाजपकडेच सर्वाधिक नगर- लक्ष होते.
बुधवारी मुंबईत नगरविकास विभागाचे राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडली. त्यात खुल्या प्रवर्गासाठी संभाजीनगरचे महापौरपद आरक्षित करण्यात आले आहे. या सोडतीची घोषणा होताच भाजपमधून महापौर पदासाठी अनिल मकरिये, महेश माळवतकर, राजू वैद्य, समीर राजूरकर, आप्पासाहेच हिवाळे, शिवाजी दांडगे, राज वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, रामेश्वर भादवे यांच्यासह महिला नगरसेविका सविता कुलकर्णी, अॅड. माधुरी अदवंत या ११ जणांची नावे इच्छुक म्हणून समोर आली आहे. दरम्यान, जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख तथा ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे हे सर्व इच्छुकांची बैठक घेऊन त्यांच्या नावांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सादर करणार आहेत. त्यांच्या आदेशानंतरच महापौर पदाचे नाव निश्चित होणार आहे.