The man who harassed a young woman on Instagram has been arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सोशल मीडियाचा गैरवापर करून एका २२ वर्षीय तरुणीचा मानसिक छळ आणि बदनामी करणाऱ्या तरुणाला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोहम्मद उजैब मोहम्मद अझहर (रा. गरम पाणी) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी रविवारी (दि.४) दिली. इस्टखामवर अश्लील संदेश पाठवून धमकावणाऱ्या या तरुणाचा छळ थांबवण्यासाठी पीडितेने पोलिसांता धाव घेतली होती.
शहरातील एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला नोव्हेंबर २०२५ पासून इन्स्टाग्रामन्स वारंवार अश्लील आणि शिवीगाळ करणारे संदेश येत होते. पीडितेने संबंधित इन्स्टाग्राम आयडी आणि फोन नंबर वारंवार ब्लॉक केले, तरीही आरोपीने वेगवेगळ्या मार्गानी संपर्क साधून त्रास देणे सुरूच ठेवले होते.
आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेची बदनामी केली तसेच तिचा पाठलाग करून मानसिक त्रास दिल्याचे तपासात समोर आले आहे. सायबर पोलिसांनी तपास केला असता, तरुणीला त्रास देण्यासाठी वापरलेला इन्स्टाग्राम आयडी मोहम्मद उर्जेब याने तयार केल्याचे निष्पत्र झाले. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई सामबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव, पीएसआय गणेश गिरी, अंमलदार राहुल काळे, अमोल सोनटक्के, संदीप पाटील, तथा मेहता यांनी केली.