मुर्डेश्वर दरीत पडल्याने महाराजांचा मृत्यू file photo
छत्रपती संभाजीनगर

मुर्डेश्वर दरीत पडल्याने महाराजांचा मृत्यू

आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणताना घडली घटना

पुढारी वृत्तसेवा

The Maharaja died after falling into the Murdeshwar gorge

केळगाव, पुढारी वृत्तसेवा :

सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील श्री. क्षेत्र मुर्डेश्वरपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुर्डेश्वर दरीत पडून गुरुवारी (दि. पाच) ५८ वर्षीय महाराजांचा मृत्यू झाला. आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणण्यासाठी ते जात होते.

राजू बाबूराव राजगुरे ऊर्फ कमलगिरी महाराज असे ठार झालेल्याचे नाव आहे. ते श्री कमलगिरी मठ देवस्थान विश्वस्त मंडळाचे सदस्य असून त्यांचा मठ हरिओम नगर, जटवाडा रोड, प्लॉट नं. २८ येथे आहे.

गुरुवारी सकाळी ८ वाजता आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणण्यासाठी ते दरीच्या दिशेने गेले होते. पायी जात असताना ९ वाजता पाय घसरून ते सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात त्यांच्या हात-पायांना गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत अडकून पडले होते.

घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली. मात्र अतिशय दुर्गम व अवघड भूभाग असल्याने सुरुवातीला बचावकार्य करणे कठीण ठरत होते. दरम्यान, मुर्डेश्वर येथील एकनाथ कोठाळे, समाधान कोठाळे व सीताराम इवरे यांनी मदतीसाठी धाव घेत सुमारे तीन किलोमीटर अंतर पायी चालत दरीत पोहोचून महाराजांना पाणी दिले. जखमी अवस्थेत असलेल्या महाराजांनी एकाच वेळी सुमारे दोन लिटर पाणी पिले.

४ महाराजांना वर काढण्यासाठी ग्रामस्थांनी जवळपास १५० ते २०० फुटांचा मार्ग तयार केला. मात्र वजन आणि कठीण भूभागामुळे बचावकार्य अत्यंत अवघड बनले. सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी वाजेपर्यंत जवळपास सात तासांच्या प्रयत्नांनंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना दरीतून बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारी (दि. सहा) येथील जटवाडा रोड हरी ओम नगर येथे समाधी देणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT