Food adulteration : यल्ला यल्ला, आईच्या गावात हॉटेलनंतर लकी ज्यूस वर अन्नप्रशासनाकडून कारवाई file photo
छत्रपती संभाजीनगर

Food adulteration : यल्ला यल्ला, आईच्या गावात हॉटेलनंतर लकी ज्यूस वर अन्नप्रशासनाकडून कारवाई

खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्नप्रशासनाकडून कारवाईचा सपाटा सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

The Food Administration has launched a vigorous crackdown to curb food adulteration

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्नप्रशासनाकडून कारवाईचा सपाटा सुरू आहे. बुधवारी यल्ला यल्ला आणि आईच्या गावात या हॉटेलवर कारवाई केल्यानंतर गुरुवारी (दि.२) पैठणगेट परिसरातील लकी ज्यूस सेंटरवर छापा टाकत मुदतबाह्य अन्नसाठा जप्त करून तो नष्ट करण्यात आला. या ज्यूस सेंटरचा परवानाही रद्द करण्यात येणार आहे. या सलग कारवायांमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे आल्यापासून खाद्यपदार्थातील भेसळ रोखण्याच्या कारवाईला नवा वेग आला आहे. शहरातही अन्नप्रशासनाकडून प्रतिबंधित खाद्यपदार्थांमधील गुटखासह भेसळ रोखण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी आणि कीर्तिका झाडे यांनी गुरुवारी पैठणगेट येथील मे लकी ज्यूस सेंटरची तपासणी केली.

यावेळी पेढीत पाश्चराइज्ड होमोजनाइज्ड टोनड दूध तसेच अल्फान्सो मँगो पल्पचा मुदतबाह्य साठा ज्यूस तयार करण्यासाठी वापरला जात असल्याचे निदर्शनास आले. हा साठा तात्काळ नष्ट करण्यात आला. तपासणीत संबंधित पेढीत आईस्क्रीमऐवजी फ्रोजन डेझर्टचा वापर ग्राहकांना केला जात असल्याचेही उघड झाले. तसेच परिसरात अस्वच्छता आढळून आल्याने संबंधित व्यावसायिकांना स्वच्छता राखण्याच्या आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून यल्ला यल्ला, आईच्या गावात या दोन हॉटेल्सचे पुढील आदेश येईपर्यंत परवाने निलंबित करण्यात आले आहे.

अन्य ज्यूस सेंटरचीही तपासणी

दरम्यान, याच मोहिमेत पैठणगेट परिसरातील फ्रेश ज्यूस सेंटर आणि न्यू लकी ज्यूस सेंटरचीही तपासणी करण्यात आली. या ठिकाणीही अन्न सुरक्षा नियमांच्या पालनाबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, तपासणी अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ही कारवाई सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या आदेशानुसार तसेच सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सुरक्षित अन्न नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाई

सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्नपदार्थांची गुणवत्ता राखून नियमांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी अशा धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT