The first ringan of Sri Sant Eknath Maharaj Palkhi ceremony in excitement
पैठण पुढारी वृत्तसेवा : पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारी सोहळ्यानिमित्त भेटीसाठी ऊन वाऱ्याची तमा न बाळगता पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे निघालेल्या शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचा थकवा दूर करण्यासाठी प्रथाप्रमाणे नाथांचा पहिले रिंगण सोहळा संत भगवानबाबा यांची संत भेट घेऊन मिडसावंगी येथील पंचक्रोशीत शनिवारी दि. २१ रोजी दुपारी रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सोहळ्यात आलेल्या वारकऱ्यांना टाळ मृदंगाच्या तालावर ङ्गभानुदास एकनाथद्ध जयघोष करून पावल्या फुगड्या रिंगण प्रथेप्रमाणे भक्ती खेळ खेळून आपला थकवा दूर केला. कुंडल पारगाव येथे तिसरा मुक्काम पूर्ण केला. यावेळी संत भगवान बाबा गड संस्थांच्या वतीने नाथांच्या पवित्र पादुकांचे पूजन करून पालखी सोहळाप्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांना मानाचा सन्मान देण्यात आल्यानंतर सोहळा माळेगाव मार्गे दुपारी मिडसावंगी येथे दाखल झाला.
यावेळी पालखी सोहळ्याचे स्वागत पाथर्डी तहसीलदार डॉ. नाईक, नायब तहसीलदार पाटील, सरपंच भगवानराव हजारे, उपसरपंच विष्णू थोरात, पंचायत समिती गटविकास अधिकारी पालवे, विस्तार अधिकारी रानमळ, ग्रामविकास अधिकारी दातीर, तलाठी नलावडे यांनी केले. पालखी सोहळा दि. २२ जून रविवारी रोजी दुपारी बीड जिल्ह्यात दाखल होणार असून शिरूर कासार येथे विसावा व भोजन झाल्यानंतर मार्गस्थ होणार आहे.
या रिंगण सोहळ्यामुळे मिडसावंगी परिसराला यंत्राचे स्वरूप प्राप्त झाले. नाथांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविक नागरिक भक्तांनी रिंगण स्थळावर मोठी गर्दी केली होती. ग्रामस्थांच्या वतीने नाथांच्या सोहळ्यात आलेल्या वारकऱ्यांना भोजन प्रसादाची व्यवस्था उत्तम ठेवली होती.