नगरपरिषद निवडणूक Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Political News : निवडणूक कशी लढायची, वरिष्ठ म्हणतील तशी

युती, आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या सूचनांची प्रतीक्षा, | तूर्तास स्वतंत्रपणे तयारी

पुढारी वृत्तसेवा

The election schedule for six municipal councils and one municipal panchayat in Chhatrapati Sambhajinagar district was recently announced

सुनील कच्छवे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि १ नगरपंचायतीचा निवडणुकीची कार्यक्रम नुकताच जाहीर झाला. परंतु अद्यापही राजकीय पक्षांच्या युती, आघाडीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांकडून सूचना मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तूर्तास सर्वांकडूनच स्वबळ आजमावण्याच्यादृष्टीने तयारी केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड आणि वैजापूर या नगरपरिषदा व फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. मंगळवारपासून या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. परंतु अद्यापही राज्यातील प्रमुख महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांचे निवडणुका कशा लढवायच्या याबाबत ठरले नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी संभ्रमात आहेत. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणुकीसाठी सध्या तरी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली जात आहे. त्याचपद्धतीने महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे पक्षही स्वतंत्रपणे तयारीला लागले आहेत. वरिष्ठांकडून जसे आदेश येतील तशा पद्धतीने निवडणूक लढविण्यात येईल, असे या पक्षांकडून सांगण्यात येत आहे.

निवडणुकीसंदर्भात संपर्कप्रमुख विनोद चाचपणी सुरू आहे. निवडणूक स्वतंत्रणे लढायची की आघाडी करून हे वरिष्ठ नेतेच ठरविणार आहेत. सध्या आम्ही सर्वच ठिकाणी आमची तयारी करत आहोत.
राजेंद्र राठोड, जिल्हाप्रमुख, शिवसेना उबाठा.
आमच्या पक्षाकडून सर्व ठिकाणी तयारी केली जात आहे. तूर्तास तरी आम्हाला वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. आमची स्वबळावर निवडणूक लढविण्याचीही तयारी आहे. परंतु शेवटी वरिष्ठच काय ते ठरवतील.
-विलास भुमरे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष सध्या सगळ्या जागांची तयारी करत आहेत. आघाडीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. महाविकास आघाडी एकत्र निवडूक लढेल, असा विश्वास आहे.
किरण डोणगावकर पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
स्थानिक पातळीवर जिथे महायुती शक्य 66 आहे तथा तावेवर माथा शाक्य जिथे जुळणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढण्यात येईल. मित्र पक्षांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न निश्चित राहील.
- सुहास शिरसाट, जिल्हाध्यक्ष, भाजप.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT