The election process of graduates is in the name of Aurangabad.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारने सन २०२३ मध्ये औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आले. परंतु निवडणूक आयोगाच्या लेखी मात्र अजूनही औरंगाबादच आहे. याआधी लोकसभा, विधानसभेची निवडणूक औरंगाबाद नावाने पार पडली. आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रियादेखील औरंगाबाद नावानेच राबविली जात आहे.
तत्कालीन महायुती सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये औरंगाबाद शहर, जिल्हा आणि विभागाचे नाव छत्रपती संभाजीनगर केले. झाले केंद्र सरकारच्या स्तरावर मात्र हे नामांतर त्यामुळे नव्हते. रेल्वेस्थानकाचे नाव औरंगाबाद असेच होते. अखेर रेल्वे प्रशासनाने रविवारी रेल्वेस्थानकाचे नाव बदलले. निवडणूक आयोगाकडून मात्र मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया औरंगाबाद नावानेच अजूनही हा बदल केलेला नाही. सन २०२४ मध्ये आधी लोकसभेच्या निवडणुकीवेळी मतदारसंघाचे नाव औरंगाबाद होते.
विधानसभेलाही शहरातील तिन्ही मतदारसंघांची नावे औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व अशी होती. आता पदवीधर मतदारसंघासाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ नावाने नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विभागीय प्रशासनाकडे विचारणा केली असता आयोगाकडून आम्हाला कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे निवडणूक आयोग नामांतराची कधी दखल घेणार असा सवाल विचारण्यात येत आहे.