चितेगाव परिसरात कामगाराचा कुजलेला मृतदेह आढळला. File Photo
छत्रपती संभाजीनगर

चितेगाव परिसरात आढळला कुजलेला मृतदेह

पुढारी वृत्तसेवा

पैठण : तालुक्यातील चितेगाव परिसरातील अजित सीड्स कंपनीच्या कामगाराचा कुजलेला मृतदेह मंगळवारी (दि.१५) रोजी कंपनी परिसरात असलेल्या त्याच्या घरी आढळून आला. सदरील कामगाराने गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती बिडकीन पोलिसांनी दिली. मृत कामगाराचे नाव वैभव युवराज पवार (वय २५ वर्ष रा. माळेगाव) असे आहे.

अधिक माहिती अशी की, चितेगाव येथील अजित सीड्स या कंपनीतील वैभव युवराज पवार हा कामगार कंपनीमध्ये काम करत कंपनी परिसरात असलेल्या कामगारांच्या घरात राहायला होता. गेल्या दोन दिवसापासून सदरील कामगार वैभव पवार राहत असलेले घर बंद होते. घरामधून दुर्गंधी येत असल्याने शेजारी राहणाऱ्या इतर कामगारांनी पवार यांची चौकशी केली. दरवाजा वाजवून देखील वैभव पवार दरवाजा उघडत नसल्याने या प्रकाराची माहिती कंपनीच्या व्यवस्थापनाने बिडकीनचे सपोनि निलेश शेळके यांना दिली. त्यांनी तात्काळ आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता. सदरील कामगाराचा कुजलेला मृतदेह आढळून आला. या कामगाराने गळफास घेवून जीवन संपवल्याचे समोर आले.

यानंतर त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून अंतिम संस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदरच्या घटनेची नोंद बिडकीन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या कामगाराने जीवन का संपवले? याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक माने हे करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT