गतिरोधकावर गाडी आदळून टायर फुटले, तरुण जागीच ठार File Photo
छत्रपती संभाजीनगर

गतिरोधकावर गाडी आदळून टायर फुटले, तरुण जागीच ठार

पडेगावच्या तारांगण फाट्यावर भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

The car hit a speed breaker, causing the tire to burst, and the young man died on the spot.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: पडेगाव रोडवरील तारांगण फाट्यावर गुरुवारी (दि.१८) मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. गतिरोधकावर गाडी आदळून टायर फुटल्याने कार उलटून २० देवडी बाजार येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सोबती गंभीर जखमी झाला आहे. रवी रविकुमार पारीक (३६, रा. देवडी बाजार, सिटी चौक) असे अपघातात मृत तरुणाचे नाव आहे.

मृत रवी पारीक ते २५ फूट फरपटत गेली. या दुर्दैवी घटनेत रवी हे आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी कन्नड येथे टाटा सफारी कारने (एमएच - १२- जेसी-४८८८) गेले होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शहराकडे परत येत असताना तारांगण फाट्यासमोरील गतिरोधकावर त्याची गाडी जोरात आदळली. त्यामुळे कारच्या डाव्या बाजूचे समोरील टायर अचानक फुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार रस्त्यावर उलटली.

वेगात असलेली ही कार जवळपास २० ते २५ फूट अंतरापर्यंत फरपटत गेली. या भीषण अपघातात रवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला दुसरा एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

गतिरोधक की मृत्यूचे सापळे ?

रस्त्यावरील अशास्त्रीय आणि धोकादायक गतिरोधक वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहेत. तारांगण फाट्यासमोर असलेला गतिरोधक अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. गतिरोधकावर रिफ्लेक्टर किंवा पांढरे पट्टे असणे अनिवार्य आहे, जेणेकरून रात्रीच्या वेळी वाहनचालकाला लांबूनच गतिरोधकाचा अंदाज येईल.

मात्र या ठिकाणी उपाययोजना नसल्याने वेगात असलेल्या वाहनांना त्याचा अंदाज येत नाही. या रस्त्यावर असे अनेक गतिरोधक असून, छोटे मोठे अपघात नेहमी घडत असताना याकडे प्रशासन साफ दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT