अंजना नदीच्या पुरात पूल गेला वाहून, वाहतूक ठप्प Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

अंजना नदीवरील पूल गेला वाहून, वाहतूक ठप्प

पुढारी वृत्तसेवा

नाचनवेल : पुढारी वृत्तसेवा

कन्नड तालुक्यातील सारोळा गाव ते सारोळा फाटा येथील अंजना नदीच्या रस्त्यावरील पूल पहिल्याच पुरात वाहून गेला आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

अंजना नदीला आलेल्या पुराने पूल वाहुन गेल्याने पिशोर हा सर्वात जवळचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे आज (मंगळवार) शहराच्या ठिकाणी जायचे असल्यास नाचनवेल व कन्नड मार्ग जास्तीचे अंतर पार करत जावे लागते. या जुनाट पुलावर अनेक दिवसांपासून मोठ-मोठे खड्डे पडले होते. दरवेळी पडणाऱ्या पावसाने पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे वाहनचालकांना तारेवरती कसरत करावी लागत होती. यामुळे सारोळा येथील शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान या पुलामुळे होत आहे.

दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक पिकांत पावसामुळे पाणी तुंबले असुन, शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. नाचनवेल परिसरातील नाचनवेल, टाकळी, आडगाव पि.,मोहरा,डोंगरगाव, आमदाबाद, सारोळा, जवखेडा बु., जवखेडा खुर्द, नादरपूर, पिंपरखेडा या भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT