कडेठाण येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला 
छत्रपती संभाजीनगर

छ. संभाजीनगर : कडेठाण येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

पुढारी वृत्तसेवा

पैठण : तालुक्यातील कडेठाण येथील एक महिला सकाळपासून बेपत्ता होती, तिचा मृतदेह सोमवारी (दि.२९) गावालगतच्या शेतामधील विहिरीत आढळून आला. कालींदा सुरेश काकडे ( वय ३५,रा. कडेठाण ता. पैठण) असे या महिलेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील कडेठाण येथील कालींदा काकडे ही महिला सकाळपासून बेपत्ता असल्याने नातेवाईकांनी सकाळी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या महिलेचा पोलिसांसह नातेवाईकांकडून शोध सुरु होता. यादरम्यान गावातील एका इसामाला कालींदा काकडे यांचा मृतदेह गावालगत असणाऱ्या एका शेतीतील विहिरीमध्ये आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला.व मृतदेह शव विच्छेदनासाठी पाचोड येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. या महिलेच्या पतीचे काही दिवसापूर्वी निधन झालेले असून ती मानसिक आजारी असल्याची माहिती समोर आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT