ठाकरे सेनेच्या ३३ उमेदवारांना अर्ज भरण्याच्या दिल्या सूचना File Photo
छत्रपती संभाजीनगर

ठाकरे सेनेच्या ३३ उमेदवारांना अर्ज भरण्याच्या दिल्या सूचना

१२ मुस्लिमांना उमेदवारी, काँग्रेससोबत वाटाघाटी सुरूच

पुढारी वृत्तसेवा

Thackeray's party has instructed 33 candidates to fill out their nomination forms.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्यासाठी शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत, पण त्याआधीच ठाकरे सेनेने आपल्या ३३ उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले. त्यानुसार बहुसंख्य उमेदवारी सोमवारी (दि. २९) आपले अर्ज दाखल केले. अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे.

शिवसेना उबाठा पक्षाला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी गळती लागली आहे. तर सत्त ाधारी भाजप-शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. तरीही ठाकरे सेनेत इच्छुकांची संख्या कमी झालेली नाही. ३४५ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या.

११५ पैकी १०६ जागांवर उमेदवार तयार असल्याचा ठाकरे सेनेचा दावा आहे. दरम्यान, मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, त्यापूर्वीच ३३ जणांना अर्ज भरण्याची सूचना केली असल्याचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले. पक्षातर्फे यादी प्रसिद्ध करण्यापेक्षा उमेदवारांना थेट मबीफ फॉर्म दिले जाणार आहेत. यावेळी पक्षाकडे २० मुस्लिमधर्मीय इच्छुकांनी तिकीट मागितले आहेत. त्यातील १२ जणांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

मॅनेज होण्याची भीती

बी फॉर्म देताना कोणताही उमेदवार मॅनेज होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. अनेकवेळा मबीफ फॉर्म घेऊनही अनेक जण ऐनवेळी अर्ज भरत नाहीत. त्यामुळे पर्यायी उमेदवारांची व्यवस्थाही केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT