State Level Youth Festival : राज्य युवक महोत्सवासाठी संघाची निवड; ४२ कलावंतांचा समावेश file photo
छत्रपती संभाजीनगर

State Level Youth Festival : राज्य युवक महोत्सवासाठी संघाची निवड; ४२ कलावंतांचा समावेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने नाशिक येथे होणाऱ्या २२ व्या इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवासाठी ४२ कलावंतांचा संघ निवडण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Team selected for State Youth Festival; includes 42 artists

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने नाशिक येथे होणाऱ्या २२ व्या इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवासाठी ४२ कलावंतांचा संघ निवडण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी सदर संघ रवाना झाला आहे, अशी माहिती. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.

नाशिक येथी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठात २० ते २३ नोव्हेंबर या काळात महोत्सव होणार आहे. यामध्ये २८ विद्यापीठांचा सहभाग आहे. नाट्य, नृत्य, साहित्य, संगीत आणि ललित कला या ५ कला गटात २८ कला प्रकारामध्ये स्पर्धा होणार आहेत. विद्यापीठाचा संघ बुधवार (दि.१८) रात्री खाना झाला.

त्यावेळी प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. संजय कवडे, संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संघासोबत सांस्कृतिक समन्वयक गौतम सोनवणे, संघ व्यस्थापक डॉ. गणेश शिंदे, डॉ. प्रेषित रुद्रवार, कविता दिवेकर, संकेत राजपूत, रामा पडुळे, सागर जोशी, राज मुंगसे, संजय जाधव, प्रदीप कांबळे, पवन शिंदे, पार्थ दायमा, सागर काटे, बाळू बोटुळे आदी सहभागी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT