summer health tips for kids 
छत्रपती संभाजीनगर

उन्हाळ्यात लहान मुलांना डिहायड्रेशन, उष्माघाताचा धोका

तज्ज्ञ म्हणतात : विशेष काळजी घ्या ; आहार, दैनंदिन सवयींकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात लहान मुलांना डिहायड्रेशन, उष्माघात (हीट स्ट्रोक), तसेच विविध संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक असतो. त्यामुळे पालकांनी या दिवसांत लहान मुलांच्या आहार, पाण्याचे प्रमाण आणि दैनंदिन सवयींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे बालरोग तज्ज्ञांनी सांगितले.

याबाबत मेडिकव्हर हॉस्पिटलमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. राहुल गोसावी म्हणाले, वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मुलांना वारंवार पाणी व द्रवपदार्थ देणे आवश्यक आहे.

दुपारच्या कडक उन्हात (सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत) मुलांना बाहेर जाणे टाळावे. हलके, सुती कपडे वापरावेत आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. उष्माघात, उलट्या, चक्कर येणे किंवा ताप यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

विशेष दक्षता बाळगा

"वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी. लहान मुलांच्या आरोग्याची विशेष दक्षता बाळगावी," असे आवाहन हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉ. विशाल कुटे यांनी केले.

उन्हाळ्यात अशी घ्या लहान मुलांची काळजी...

  • दिवसभर पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ द्या

  • दुपारी बाहेर खेळणे टाळा

  • हलके व सैल सुती कपडे परिधान करा

  • ताजे फळे व घरगुती आहार द्या

  • स्वच्छता राखा आणि हात धुण्याची सवय लावा

  • मुलांना बंद गाडीत एकटे सोडू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT