Student Protest : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक file photo
छत्रपती संभाजीनगर

Student Protest : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक

पुणे येथे गेल्या आठ दिवसांपासून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू

पुढारी वृत्तसेवा

Students take an aggressive stance demanding the MPSC Chairman's resignation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुणे येथे गेल्या आठ दिवसांपासून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, एमपीएससीचे अध्यक्ष भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून, त्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या व्यवस्थेविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि.८) क्रांती चौकात सरकारच्या निषेधार्थ आंदोलनात करण्यात आले.

आंदोनलात अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होत अध्यक्ष भिमनवार जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही भाजप आमदारांकडून रोहित पवार विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करत असल्याचा आरोप केला जात असल्याचे समितीच्या क्रांती चौकात आंदोलन करताना विद्यार्थी.

पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, पुण्यात आंदोलन करणारे विद्यार्थी स्वतः रोहित पवार यांच्या भेटीला गेले. पेपरफुटीमुळे अभ्यास आणि भवितव्याचे नुकसान होत असल्याने न्याय मिळवून देण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती विद्यार्थ्यांनी केल्याचा दावा समितीने केला.

पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात सुशील बोर्डे, डॉ. प्रकाश इंगळे, भूषण तांबे, योगेश घुगे, मोहित जाधव, सागर नागरे, दिग्विजय शिंदे, अनंता कराळे, अजय डिडोरे यांच्यासह विद्यार्थी कृती समितीचे कार्यकर्ते व विद्यार्थी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT