ST to charge 30% higher fare for group bookings
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या बसने मोठ्या समूहाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता ग्रुप बुकिंग आहे. एकेरी प्रवासासाठी बस आरक्षित करणाऱ्या प्रवासी गटाकडून प्रवासभाड्याच्या ३० नियमित टक्के अतिरिक्त भाडे 00 आकारण्याचा निर्णय महामंडळाने निर्णय १० ऑगस्ट २०२६ पासून अंमलात आणण्यात आला आहे.
गौरी-गणपती, होळी, आषाढी पंढरपूर यात्रा तसेच अन्य मोठ्या उत्सवांच्या काळात प्रवासी गटांकडून मोठ्या प्रमाणावर ग्रुप बुकिंग केले जाते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बस आरक्षित केल्यानंतर ती बस परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध नसल्याने अनेकदा रिकामी परतावी लागते. त्यामुळे महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हे नुकसान कमी करण्यासाठी एकेरी प्रवासाच्या ग्रुप बुकिंगवर ३० टक्के अतिरिक्त भाडे आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परतीच्या प्रवासालाही नियम
ग्रुप बुकिंग करून दुहेरी प्रवासाची बस आरक्षित केल्यास प्रवासी गटाला संबंधित मार्गावरील प्रचलित भाडे दराने बस उपलब्ध करून दिली जाईल. मात्र परतीच्या प्रवासासह बस आरक्षित करताना प्रवासी गटातील प्रवाशांची संख्या आणि प्रत्यक्ष प्रवासाच्या अंतरानुसार भाडे आकारले जाणार आहे.
नियमातील महत्त्वाचे मुद्दे
ग्रुप बुकिंगच्या एकेरी प्रवासासाठी ३० टक्के अतिरिक्त भाडे
दुहेरी प्रवासासाठी प्रचलित दरानुसार बस उपलब्ध
सवलतधारक प्रवाशांना नियमानुसार सवलत
अपघात सहाय्यता निधी, स्वच्छता अधिभार, लगेज व आरक्षण चार्जेस यासारखे विद्यमान शुल्क कायम योजना १० ऑगस्ट २०२६ पासून लागू
सवलतीच्या प्रवाशांनाही लाभ
ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना आदी सवलतीच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना नियमाप्रमाणे सवलत मिळणार आहे. मात्र एकेरी प्रवासासाठी ग्रुप बुकिंग केल्यास सुधारित प्रवासभाड्यावर ३० टक्के वाढ लागू राहणार आहे. गौरी-गणपती जादा वाहतूक कालावधीत ग्रुप बुकिंगसाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. ९ ऑगस्ट ते २७ऑगस्ट २०२६ या कालावधीत एकेरी प्रवासासाठी ग्रुप बुकिंग केल्यास सुधारित दरानुसार ३० टक्के वाढीव प्रवासभाडे आकारले जाणार आहे.