एसटी : १७ योजनेअंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा  file photo
छत्रपती संभाजीनगर

एसटी : १७ योजनेअंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा

प्रवाशांना विविध ९ योजनांत ५० टक्के सवलत

पुढारी वृत्तसेवा

ST: Free travel facility under 17 schemes

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटी बस गरिबांची लाईफलाईन समजली जाते. अडल्या नडल्यांच्या मदतीला एसटी महामंडळ धावून जात असते. विविध प्रकारच्या सुमारे ४३ योजनांच्या माध्यमांतून सवलतीच्या प्रवासांची मुभा प्रवाशांना अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. यात तब्बल १७योजना अशा आहेत की, त्यात पूर्णपणे मोफत प्रवास करण्याची मुभा आहे.

एसटी महामंडळ विविध वर्गातील प्रवाशांना अनेक सुविधा देते. अनेकांनी मोफत प्रवास तसेच ५० टक्के, ७५ टक्के, ६६ टक्के व इतर सवलतीसह प्रवाशांना सेवा देत आहे. स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ, अमृत ज्येष्ठ, दौणाचार्य, छत्रपती, अर्जुन, दादाजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त खेळाडू तसेच अधिस्विकृतीधारक पत्रकार, समाजभूषण पुरस्कार कर्ते, तर कुष्ठरोग, डायलेसीस, हिमोफेलियाग्रस्त असे सुमारे १७ विविध योजनांत १०० टक्के मोफत प्रवासांची सुविधा आहे. या पाठोपाठ ७५ टक्के सवलत असलेल्या ५ तर ७० टक्के, ६६.६७ टक्के सवलत असलेल्या योजनांचाही समावेश आहे.

विविध ४३ सवलती

एसटी महामंडळ विविध वर्गातील खेळाडू, असो, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी असो की आजारी व्यक्ती असो अशा विविध प्रकारच्या तब्बल ४३ सवलतींच्या योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमांतून विविध वर्गातील प्रवाशांच्या मदतीसाठी एसटी सदैव तत्पर सेवा देत आहे. त्यांना कमी पैशात त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असून, या माध्यमांतून लाखो प्रवाशांनी याचा लाभ घेतलेला आहे.

९ योजनांत ५० टक्के सवलत

सवलतीची टक्केवारी पाहिली तर ५० टक्के सवलतीत विविध ९ योजनांचा समावेश आहे. यात महिला सन्मान योजना, दिव्यांग, शैक्षणिक स्पर्धा, विद्यार्थ्यांना सुटीत घरी जाणे-येणे, तसेच आजारी आई-वडिलांना भेटण्यासाठी जाणे-येणे, शैक्षणिक सहलीसाठी प्रासंगिक करार व इतर योजनांचा समावेश आहे. यासोबत ४५ टक्के, ४० टक्के तसेच ३३ टक्के सलवतीच्याही विविध योजनांअतर्गत प्रवासाची मुभा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT