पुसद प्रकल्पात 'पुढारी टॅलेंट सर्च' परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद file photo
छत्रपती संभाजीनगर

पुसद प्रकल्पात 'पुढारी टॅलेंट सर्च' परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आश्रमशाळा मुख्याध्यापक व शिक्षकांच्या देखरेखीखाली परीक्षा शांततेत

पुढारी वृत्तसेवा

Spontaneous response to 'Pudhari Talent Search' exam in Pusad project

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

दैनिक 'पुढारी' आणि आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पुसद प्रकल्प विभागात सोमवारी (दि. २३) घेण्यात आलेल्या मपुढारी टॅलेंट सर्च २०२६फया परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परीक्षेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

पुसद प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, शिक्षण विभागाचे एपीओ अरुण चव्हाण यांनी स्वतः शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. मपुढारीफ्ना हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांना समोरे जाण्यासाठी आवश्यक अस-लेला आत्मविश्वास वाढिण्यास उपयुक्त आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सराव होऊन भविष्यात राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये सहज यश मिळविता येईल, अशा शब्दांत अरुण चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परी क्षेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय शिष्यवृत्ती व अन्य परीक्षांच्या धर्तीवर चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मपुढारी टॅलेंट सर्च २०२६फ परीक्षा पुसत प्रकल्प अधिकारी मेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद, वडगाव शिंदे, वसंतपूर, हर्षी, कोरटा, खैरखेडा येथे घेण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी १ या सत्रात मराठी विषयाची परीक्षा पार पडली.

ही परीक्षा अत्यंत नियोजबद्ध पद्धतीने आश्रमाशाळा मुख्याध्यापक व शिक्षकांच्या देखरेखीखाली शांततेत पार पडली. पुसद प्रकल्पांतर्गत असलेल्या आश्रमशाळांमध्ये ही परीक्षा झाली. ओएमआर सीटवर परीक्षा घेण्यात आली. मपुढारीफचे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे, व्यवस्थापक बाळासाहेब वाजे, कार्यकारी संपादक विनोद काकडे, युनिट हेड अमोल कोल्हे, समन्वयक राजेंद्र महाजन, अशोक विखे यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नेटके नियोजन केले होते.

परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना रोल नंबर देण्यात आले होते. त्यानुसार सर्व केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आली नाही. सकाळपासूनच सर्व परीक्षा केंद्रांवर उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर परीक्षेबाबत उत्कंठा दिसत होती. त्यानंतर बैठक व्यवस्था आणि पेपर कशा पद्धतीने सोडवावा, याबाबतचे मार्गदर्शन संबंधित शिक्षक व मपुढारीफ टीम करत होती. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मपुढारीफ्ने काळजी घेतली होती. त्यामुळे सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली.

पालकांचा मोठा प्रतिसाद

परीक्षेदरम्यान आदिवासी प्रकल्पातील उच्चपदस्थ आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन परीक्षा प्रक्रियेचे प्रत्यक्ष अवलोकन केले. अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत गोडी निर्माण होणार असून, परीक्षा देण्याचा सरावही होणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच नियमित होणान्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी हा उपक्रम उपयोग असल्याची प्रतिक्रिया अनेक पालक व शिक्षकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT