Crime News : स्नॅचर्स'चा धुमाकूळ; एकीचे गंठण, दुसरीची पर्स हिसकावली File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : स्नॅचर्स'चा धुमाकूळ; एकीचे गंठण, दुसरीची पर्स हिसकावली

जवाहरनगर आणि पुंडलिकनगर हद्दीत भरदिवसा घटना; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

Snatchers' Smoke; One's neck, the other's purse was snatched

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात सोनसाखळी चोरट्यांनी आणि भामट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, महिलांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील दागिने आणि हातातील पर्स हिसकावून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. शुक्रवारी (दि. १४ ऑगस्ट) शहरात भरदिवसा घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी एका महिलेचे गंठण, तर दुसरीची पर्स हिसकावून नेली. याप्रकरणी जवाहरनगर आणि पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घटना १ : सूतगिरणी चौकात गंठण ओरबाडले

फिर्यादी दीपाली संदीप जाधव (३८, रा. पीडब्ल्यूडी हाऊसिंग सोसायटी, दर्गा रोड) या १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७:२० वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील सूतगिरणी चौकात स्टेडियम गेटसमोर भाजी खरेदी करण्यासाठी थांबल्या होत्या. त्या भाजी खरेदी करण्यात मग्न असल्याची संधी साधून दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी पाठीमागून त्यांच्याजवळ येत अचानक गळ्यातील ५ ग्रॅम सोन्याचे गंठण हिसका मारून तोडले आणि सुसाट पळ काढला. या प्रकाराने घाबरलेल्या दीपाली जाधव यांनी आरडाओरड केली; मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक सुतार करीत आहेत.

घटना २ : स्कूटीस्वाराने हिसकावली

जात पर्सदुसरी घटना पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. संगीता अशोकराव महाजन (५५, रा. न्यू हनुमाननगर, गल्ली नं. ४) या दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाचे काम करून उदरनिर्वाह करतात. १४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता त्या सिडको एन-४ भागातील मंगलनाथ मल्टीस्टेट बँकेजवळून एकट्याच पायी घरी होत्या.

त्याचवेळी मागून स्कूटीवरून अंदाजे २२ ते २५ वर्षे वयाचा एक तरुण आला. त्याने संगीता महाजन यांच्या हातातील वस्तू असलेली पर्स हिसकावली. त्या आरडाओरड करण्यापूर्वीच तरुणाने स्कूटी भरधाव वेगाने गजानन मंदिराच्या दिशेने 'राँग साईड' ने पळवून नेली. याप्रकरणी संगीता महाजन यांच्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास हवालदार शिंदे करीत आहेत. भरदिवसा घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे रस्त्यावरून पायी चालणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

महिलांमध्ये भीतीचे वातावरण

भरदिवसा महिलांना लक्ष्य करून गंठण आणि पर्स हिसकावण्याच्या दोन घटनांमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गर्दीच्या ठिकाणीही चोरटे महिलांना लक्ष्य करीत असल्याने रस्त्यावरून एकट्याने जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून स्नॅचर्सवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT