प्रा. मन्सूर कादरी
सिल्लोड : ग्रामिण जनतेचे सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर गेल्या चार वर्षांपासून लोकप्रतिनिधींचा अभाव होता. निवडणूक नाही, जनमत नाही फक्त फाइल, फेरफार आणि आदेश, अशा प्रशासकीय बाबुगिरीने लोकशाहीचा गळा दाबला गेला होता.
आता मात्र प्रशासकीय राज्य संपवण्यासाठी व 8-12 वर्षांची सत्तेची तहान भागविण्यासाठी ग्रामिण राजकारणी आणि मतदार थेट मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे केवळ मतदान नसून ग््राामीण सत्तेसाठी लोकशाहीचे थेट युद्ध ठरणार आहे-बाबुगिरी हटवा, लोकशाही वाचवा हा मतदारांचा सूर आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अडथळ्यांची भिंत कोसळली असून निवडणूक आयोगाने 5 फेबुवारीला मतदान व 7 फेबुवारीला मतमोजणी जाहीर केली आहे. 27 जानेवारी दुपारी साडेतीननंतर अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप, त्यानंतर केवळ आठ दिवसांचा प्रचार पण वर्षानुवर्षांचा राजकीय हिशोब चुकता होणार!
1992 नंतर प्रथमच जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका एवढ्या प्रदीर्घ अंतराने होत असल्याने इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे. गटागटांत महत्त्वाकांक्षांचा स्फोट झाला असून राजकीय हालचालींना उधाण आले आहे.मागील विधानसभा निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांचा अवघ्या अडीच हजार मतांनी झालेला विजय भाजपसाठी अजूनही बोचरा आहे.
त्यामुळे सत्तार यांनी यंदा अधिक आक्रमक, शिस्तबद्ध व काटेकोर रणनीती आखली आहे-ङ्घङ्गअडीच हजार मतांचे मताधिक्य; सत्तारांची रणनीती भाजपसाठी डोकेदुखी.फफया 11 गट व 22 गणांमध्ये शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि महाविकास आघाडीने बैठका, आढावे व रणनीतीचा धडाका सुरू केला आहे.केऱ्हाळा गट : राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे ठगण पाटील भागवत सक्रिय; त्यांच्या पत्नी कल्पनाताई पाटील भागवत यांची उमेदवारी जवळपास निश्चित.
केऱ्हाळा, शिवना-गटागटात चर्चा, गणागणात धडधड वाढली
डोंगरगाव गट : शिवसेनेच्या राजकीय डावामुळे भाजपची गणिते कोलमडली; निवृत्त जिल्हा निबंधक देविदासराव पालोदकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित. अंतिम चित्र केऱ्हाळा, डोंगरगाव, घाटनांद्रा व शिवना गटांत रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. ङ्गङ्घअनपेक्षित लक्ष्मी पावेल-तर काहींची राजकीय स्वप्ने धुळीस मिळतील. ही निवडणूक म्हणजे ग््राामीण राजकारणाचा लिटमस टेस्ट आहे- उमेदवार अनेक, पण सत्ता एकच! केऱ्हाळा ते शिवना-गटागटात चर्चा, गणागणात धडधड वाढली.