Sillod News : ट्रक-बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक file photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod News : ट्रक-बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक

सिल्लोड : चिंचखेड्याजवळील घटना, सुदैवाने जीवितहानी नाही

पुढारी वृत्तसेवा

Sillod News : Truck-Bolero pickup collided head-on

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : ट्रक व टोमॅटो घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीची समोरासमोर धडक झाली. यात पिकअपमधील टोमॅटो रस्त्यावर विखुरल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात बुधवारी (दि. १५) पहाटे जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चिंचखेड्याजवळ घडला.

बारामती येथून टोमॅटोने भरलेले बोलेरो पिकअप (एमएम- ४२बीएफ-९२५२) अकोल्याकडे जात होता. तर यादरम्यान ट्रक (केए २२, सी १८२५) जळगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. ही दोन्ही वाहने समोरासमोर धडकली. यात पिकअपमधील टोमॅटोचे कॅरेट रस्त्यावर विखुरल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

दुसऱ्या घटनेत बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास तेवेरा कारचे (एमएच २८, एएन- १४३९) सेंट्रल बोल्ट तुटल्याने पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, बीट जमादार, रविकिरण भारती, दीपक पाटील यांनी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली.

वाहतुकीची कोंडी

चिंचखेड्याजवळील पूर्णा नदीवरील नव्या पुलावरुन वाहतूक सुरु आहे. तर जुन्या पुलावर काम सुरु असल्याने वाहतूक एकेरी मार्गाने सुरु आहे. या महामार्गाने मोठी वर्दळ असल्याने पुलावर आधीच वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यात वाहने नादुरुस्त, अपघातामुळे वाहतूक कोंडीत भर पडून पोलिसांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT