Silent march of Jain community at Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील एच.एन.डी हॉस्टेल व भगवान महावीर जैन मंदिर सुमारे साडे तीन एकर क्षेत्रफळ असलेली मालमत्ता बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव सुरू आहे. याला कडाडून विरोध म्हणून शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने सोमवारी (दि.२७) काळी फीत लावून मूक मोर्चा काढण्यात आला. अशा घटना यापुढे होऊच नये, अशी मागणीही करण्यात आली. हजारोंच्या संख्येने निघालेले हा मूक मोर्चा लक्षवेधी ठरला.
श्री. १००८ खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पाश्वनाथ मंदिर राजाबजार व सकल जैन समाज तसेच एच.एन. डी. हॉस्टेल विद्यार्थ्यांच्या वतीने माजी राजाबाजार येथून एचएनडी की धडकन है समाज की पहचान असे घोषवाक्याचे पोस्टर हाती घेऊन मूक मोर्चा काढला. हा मूक मोर्चा श्री संस्थान गणपती मंदिर, शहागंज, चेलीपुरा मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
यावेळी पांढरे रंगाचे कपडे परिधान करून हाताला काळी फीत लावून हाती पोस्टर घेऊन शांततेत मोर्चा काढला. यावेळी पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी यांनी सांगितले की, ही ट्रस्ट सार्वजनिक धर्मदाय ट्रस्ट आहे. सध्या त्या जागेचा ताबा बिल्डरने घेतल्याने जैन समुदायाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा रद्द करण्यात येत आहे.
हे अंत्यत चुकीचे आहे. वारंवार अशा घटना घडत आहेत. याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अशा घटना घडूच नये. अशी काढला आहे. मागणी करण्यासाठी हा मूक यावेळी डॉ. प्रणामसागरजी महाराज, सचिव प्रकाश अजमेरा, संजय पहाडे, झुंबरलाल पगारिया, अनिलकुमार संचेती, सजय सचेती आदी सकल जैन समाज बांधव हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. यावेळी डॉ. प्रमाणसागर महाराज यांचे प्रवचन झाले. तसेच मोर्चात यावेळी पंचरंगी ध्वज हाती घेऊन लहानपणापासून ते वरिष्ठांपर्यत मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.