Sambhajinagar Crime News : शटर उचकटून ६० लाखांचे टुल्स लांबवले file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : शटर उचकटून ६० लाखांचे टुल्स लांबवले

महागडे कटिंग टूल्स चोरून नेल्याची मोठी घटना रविवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली.

पुढारी वृत्तसेवा

Shutter forced open; tools worth ₹60 lakh stolen

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा रांजणगाव फाट्याजवळील एका टूल्स विक्रीच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल ६० लाख रुपयांचे सीएनसी व व्हीएनसी मशिनरीचे महागडे कटिंग टूल्स चोरून नेल्याची मोठी घटना रविवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव फाट्याजवळ ई-३४ सेक्टरमध्ये जितेंद्र साळुंके यांचे लक्ष्मी इंटरप्रायजेस नावाने टूल्स विक्रीचे दुकान आहे. पवन सरोदे हे तिथे टूल्स डिलिव्हरीचे काम करतात. शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करण्यात आले होते.

रविवारी सकाळी शेजारील ट्रान्सपोर्ट चालकाने पवन सरोदे यांना फोन करून दुकानाचे शटर उचकटल्याची माहिती दिली. त्यानंतर मालक साळुंके आणि सरोदे यांनी दुकानात धाव घेतली असता, दुकानातील सीएनसी आणि व्हीएनसी मशिनरीचे सुमारे ६० लाख रुपये किमतीचे कटिंग टूल्स चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला असून, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सीसीटीव्हीत चोरटे कैद

या घटनेनंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात रविवारी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले दोन चोरटे दुकानातून टूल्स पळवताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT