शिवना टाकळी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

शिवना टाकळी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो

परतीच्या पावसाचा धुमाकूळ; मका, कापूस भाजीपाला पिकांची नासाडी

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शिवना मध्यम टाकळी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. शेतातील सोंगणी केलेली मका व फुटलेला कापूस पावसाने भिजत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

तालुक्यात सोमवारी मध्यरात्री सर्वत्र पाऊस झाला. यात कन्नड व चापानेर मंडळात अतिवृष्टी झाली झालेल्या परतीच्या पावसाने तालुक्यातील गांधारी आणि शिवना नदीला मोठा पूर आला. सर्वात मोठा असलेला शिवना टाकळी प्रकल्प सोमवारी सकाळी ११ वाजता ओव्हरफ्लो झाला. प्रकल्पाचे १ आणि ५ क्रमांकाचे दोन दरवाजे १५ सेटीमिटर उघडण्यात आले. या दोन्ही दरवाजातून ११४९ क्युसेस पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.

दरम्यान, सन २००५ ला शिवना टाकळी प्रकल्प पूर्ण झाला. प्रकल्प पूर्ण झाल्यापासून या २० वर्षात हा शिवना टाकळी प्रकल्प ६ वेळेस ओव्हरफ्लो झाला. सन २०२०,२१,२२ या तीन वर्षी सलग शिवना टाकळी ओव्हरफ्लो झाला होता. जोपर्यंत प्रकल्पाच्या वरील भागातून पाण्याची आवक सुरू राहिल तोपर्यंत १ आणि ५ दरवाजातून पाण्याचा विसर्ग ११४९ क्युसेस ने सुरू राहणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी अशपाक शेख यांनी दिली आहे.  

सोमवारपर्यंत पावसाची नोंद

• कन्नड ७१ मि. मी. आता पर्यंत एकूण ८२३ मि. मी., • चापानेर: ७१ मि. मी. एकूण ८०३ मि. मी., • देवगाव ३८ मि. मी. एकूण ७६८ मि. मी. • चिखलठाण: ३४ मि. मी., एकूण ७५७ मि. मी. • पिशोर ४८ मि. मी., एकूण ८९२ मि. मी.. • नाचनवेल ४० मि. मी., एकूण ७३५ मी मी. • करंजखेड ३७ मि. मी., एकूण १२४४ मि. मी.. • चिंचोली ३७ मि. मी.. एकूण १११० मि. मी. • एक दिवसाची एकूण पावसाची सरासरी ४७ मि. मी. आतापर्यंतची एकूण पावसाची सरासरी ८९७.३८ मि. मी. अशी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT