वेरूळ येथे शिवविचार, स्वराज्य जागृतीसाठी अभिवादन सोहळा file photo
छत्रपती संभाजीनगर

वेरूळ येथे शिवविचार, स्वराज्य जागृतीसाठी अभिवादन सोहळा

वेरूळमध्ये शहाजीराजे भोसले जयंती, छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पुढारी वृत्तसेवा

Shivavichar, Swarajya awareness at Verul

वेरूळ, पुढारी वृत्तसेवा : स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या ४३२ व्या जयंती व छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान दिवसानिमित्त वेरूळ गावात अभिवादन व आदरांजली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शहाजीराजे भोसले जयंती उत्सव समिती व शिवभक्तांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला लाखो शिवभक्तांची उपस्थिती होती, ज्यात विविध संत, महात्म्यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज, नाथ आश्रमाच्या आक्काताई महाराज, कैलास आश्रमाचे अभयानंद महाराज, नागेश्वर नंद महाराज, विवेकानंद महाराज, सिद्धेश्वर महाराज यांसह अनेक प्रमुख व्यक्तिमत्वांनी आपल्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवली. सर्वांनी एकसाथ शिवविचार व स्वराज्याच्या संस्कारांची जागरूकता वाढवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात उत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केली. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महार-ाजांच्या स्वराज्य संकल्पाचे मूळ शहाजी महाराज यांच्या गढीतूनच होते. त्यांचे कार्य आणि संस्कार आजही प्रत्येक समाजासाठी प्रेरणा आहे. आपल्याला हे संस्कार प्रत्येक घरात पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही गेल्या नऊ वर्षांपासून या प्रकारचे आयोजन करत आहोत.

अभयानंद गिरीजी महाराज यांनी सांगितले की, समाजामध्ये शिवविचार आणि संतविचाराची जागृती आवश्यक आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. यावेळी कैलास कोरडे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात वेरूळच्या संत जनार्दन स्वामी गुरुकुलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपत मस्के व मच्छिद्र देवकर यांनी केले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या अभिवादन सोहळ्यात सहभाग घेतला. याप्रसंगी, राजेंद्र पवार यांनी सर्व उपस्थितांचा आभार मानले आणि पुढील शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

जयंती महोत्सव समितीच्या वतीने राजेंद्र पवार यांनी आभार व्यक्त केले व सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी पवार यांनी केले.

तर स्वराज्य स्थापनेचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकता येईल शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा सविस्तर इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केला जावा, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वराज्य स्थापनेचा इतिहास शिकता येईल आणि एक संस्कारीत पिढी तयार होईल. यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची विनंती स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT