Sanjay Shirsat : शिवसेना, भाजप २०२९ ची निवडणूक स्वबळावर लढवू शकतात  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sanjay Shirsat : शिवसेना, भाजप २०२९ ची निवडणूक स्वबळावर लढवू शकतात

शिरसाट यांच्या या विधानामुळे महायुतीत तणाव वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena and BJP could contest the 2029 elections independently: Minister Shirsat

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा प्रत्येक राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करत असतो. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढवू शकतात, तसे करण्याचा त्यांना अधिकार आहे, असे विधान शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. मित्र पक्षांनी निवडणूक वेगवेगळी लढवू नये याबाबत राजकारणात कोणताही करार नसतो, असेही शिरसाट म्हणाले. शिरसाट यांच्या या विधानामुळे महायुतीत तणाव वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे.

आगामी निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजप तयारी करत असल्याचा दावा सामना या वर्तमानपत्रातून करण्यात आला आहे. याबाबत मंत्री संजय शिरसाट यांना विचारले असता, त्यांनी वरील विधान केले. भाजपाची गाडी आता फुल झाली आहे. ही गाडी अजित पवारांचा पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेला ठोकर मारून पुढे जाण्याचा विचार करत आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे आणि उद्या शिंदे यांचे आमदारही भाजपामध्ये जातील असे सामनाच्या संपादकीय लेखात म्हटले आहे.

याविषयीच्या प्रश्नावर मंत्री शिरसाट म्हणाले, सर्वच राजकीय पक्ष आपापली संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्न करत असतात. त्यासाठी निवडणुकांची तयारी केली जाते. तसे करण्याचा त्यांना अधिकार आहे. मित्रपक्ष जर स्वतंत्रपणे निवडणूक लढवू इच्छित असतील तर त्यांना रोखणारी कोणतीही राजकीय व्यवस्था नाही. हीच गोष्ट शिवसेना पक्षालाही लागू होते.

मित्रपक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवू नये, यासाठी राजकारणात कोणताही बाँड झालेला नसतो. युतीत आहोत म्हणजे भविष्यात वेगळे लढणार नाही, असे नाही. भाजपा आणि शिवसेना वेगळे होऊन अगदी एका जा-गेसाठीसुद्धा स्वतंत्रपणे निवडणुका लढवू शकतील. भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास शिवसेनेकडेही तोच पर्याय खुला असेल. यापूर्वीही जागावाटपावरून दोन्ही पक्ष वेगळे होऊन एकमेकांविरुद्ध निवडणुका लढले आहेत, अशी आठवणही शिरसाट यांनी करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT