Shendra MIDC : शेंद्रा एमआयडीसीत चक्क उघड्यावरच गटारी... File Photo
छत्रपती संभाजीनगर

Shendra MIDC : शेंद्रा एमआयडीसीत चक्क उघड्यावरच गटारी...

रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग, पायाभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी, उद्योगांना प्रचंड त्रास

पुढारी वृत्तसेवा

Shendra MIDC: Open drains in Shendra MIDC Administration fails to provide infrastructure

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगरः पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीत खराब रस्ते आणि बंद पथदिव्यांमुळे झालेली दुरवस्था कमी होती की काय यात उघड्या गटारी आणि कचऱ्याच्या समस्येची भर पडली आहे. इथल्या अनेक रस्त्यांवरच कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधीचे पाट अक्षरशः तुंबल्याचे बघून कोण आणि का म्हणावे फाइव्ह स्टार इंडस्ट्री, असा प्रश्न उद्योजकांनाच पडला आहे. दुसरे म्हणजे, इतर कामांमध्ये नेहमीच ठेकेदारांच्या नावे नोटीस देऊन जवाबदारी झटकणाऱ्या एमआयडीसी प्रशासनाला इतक्या वर्षात कचरा आणि ड्रेनेज लाइनची सोय हेच अपयश येथे तुंबलेल्या दुर्गंधीतून उघड होत आहे.

करता आलेली नाही, मराठवाड्यातील औद्योगिक प्रगतीची नवी दारे खुली करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथे नवनवीन उद्योग यावे, आंतरराष्ट्रीय कंपन्या सुरू व्हाव्यात, यासाठी शासनाकडून रेड कारपेट अंथरले आहे. तर दुसरीकडे इथल्या चालू उद्योगांनाच पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यातही प्रशासन अपयशी ठरल्याचे वास्तव चित्र उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. इथल्या शेंद्रा एमआयडीसीत अनेक नामांकित कंपन्यांसह इतर लहान-मोठे एक हजारांहून अधिक उद्योग आहेत.

या उद्योगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तर लांब, शेंद्रा एमआयडीसीचेच दयनीय, दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. मुख्य आणि प्रमुख मार्ग सोडले तर अंतर्गत बहुतांश ठिकाणी उखडलेल्या रस्त्यांवर अंधार, जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, प्रचंड अस्वच्छता आणि तुंबलेल्या गटारींचे वास्तव आहे. कचरा व्यवस्थापन नसल्याने रस्त्यावर, रिकामे प्लाटवर जागोजागी ढिगारे लागलेली आहेत. ड्रेनेजलाइनच्या सुविधेअभावी कंपन्यांसमोरच शौच खड्यांची दुर्गंधी सोडली आहे. अनेक वर्षांपासून हे चित्र बदलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात अडचणी वाढतात. रोगराईचा धोका उद्धभवतो. याचा उद्योजक, कामगारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

नियोजन शून्य प्रशासनाचे पितळ उघडे

उद्योजकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, तक्रार करायची कुठे ? प्रशासनाला सांगितले तर स्वखचनि ईटीपी प्लांट करून घ्या, | असा उलट सल्ला मिळतो. काही मोठ्या कंपन्यांनी तशी सोय केली आहे. मात्र, बहुतांश उद्योगांना हा खर्च न परवडणारा असल्याने नाईलाजाने त्यांनी रस्त्यावरच दुर्गंधीयुक्त पाण्याला वाट करून दिली आहे. यामुळे अनेक ठिकाणी ड्रेनेजच्या गटारी तुंबल्या आहेत. दुर्गंधीचे हेच चित्र एमआयडीसी प्रशासन इथल्या उद्योगांना साध्या-साध्या पायाभूत सुविधा देण्यातही स्पेशल अपयशी ठरल्याचे पितळ उघड करत आहे.

हीच का फाइव्ह स्टार इंडस्ट्री? शेंद्रा एमआयडीसीत ठिकठिकाणी खड्डेमय आणि अंधारलेल्या रस्त्यांवर जागोजोगी पडलेला कचरा वाढलेली झाडीझुडपे आणि तुंबलेल्या गटारी दिसून येतात. अनेक उद्य-ोजकांसह देशविदेशातील कंपन्यांचे शिष्टमंडळांची ये-जा असते. मात्र, सद्यस्थितीत या औद्योगिक वसाहतीचे दयनीय चित्र बघून हीच का फाइव्ह स्टार इंडस्ट्री? असा प्रश्न पडत आहे.

सांडपाणी, कचरा व्यवस्थापन गरजेचे या औद्योगिक क्षेत्रात ड्रेनेज लाइनची सुविधा नाही. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आहे. काही कंपन्यांनी शौच खड्डे केले आहेत. परंतु ते अपुरे आहेत. त्यामुळे कचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याचे नियोजन करण्यात यावे.
दिलीप देशमुख, स्थानिक उद्योजक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT