प्रशिक्षकाडूनच अल्‍पवयीन खेळाडूवर अत्‍याचार झाल्याची घटना घडली आहे. (File Photo)
छत्रपती संभाजीनगर

प्रशिक्षकाडूनच अल्‍पवयीन खेळाडूवर अत्‍याचार, पीडितेला धमकावत केली बळजबरी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खो-खो खेळासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या अल्‍पवयीन (वय १३ वर्षे १० महिने) शाळकरी मुलीला मुंबईला जायचे म्हणून प्रशिक्षक गावातून घेऊन आला. येथे रेल्वेला उशिर असल्याचे कारण सांगून जवळच एका हॉटेलमध्ये रुम बुक केली. तेथे मुलीवर अत्याचार केला. १९ दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून आरोपीच्या अटकेसाठी पथक बालानगरला (ता. पैठण) येथे रवाना झाले आहे.

संबधित प्रशिक्षक खो-खो चा राष्‍ट्रीय खेळाडू

शिवाजी जगन्नाथ गोर्डे (रा. बालानगर, ता. पैठण), हॉटेल मालक पूजा रोहित राठोड आणि व्यवस्थापक सादिक मिर्झा बेग, अशी संशयित आरोपींची नावे आहेत. शिवाजी गोर्डे हा खो-खोचा प्रशिक्षक असून तो खो-खोचा राष्ट्रीय खेळाडू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली.

रेल्‍वे स्‍टेशन परिसरात घडला गुन्हा

अधिक माहितीनुसार, संबधित मुलीच्या आईने फिर्याद दिली. उत्कृष्ट खो-खो खेळणाऱ्या संबधित मुलीची राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. तिचा २८ सप्टेंबरला गुजरात येथे सामना होता. त्यासाठी आरोपी प्रशिक्षक शिवाजी गोर्डे हा तिला २६ सप्टेंबरला मुंबईला घेऊन निघाला. तेथून उर्वरित खेळाडू त्यांच्यासोबत येणार होते. मुंबईला जाणारी रेल्वे रात्री १० वाजता असल्याचे सांगून त्याने समोरच असलेल्या एका हॉटेलवर आराम करण्याचे ठरविले. तेथे एक रुम बुक केली. रुममध्ये गेल्यावर पीडितेला धमकावत बळजबरी केली.

पीडितेला बदनामीची धमकी

सुरुवातीलाच हा भयंकर प्रकार घडल्यामुळे घाबरलेल्या पीडितेला आरोपी बळजबरी गुजरातला घेऊन गेला. तेथे खो-खो सामना खेळून आल्यावर पीडिता प्रचंड घाबरलेली होती. ती शाळेत गेल्यावर आरोपी तेथे जाऊन सोबत येण्यासाठी धमकावत होता. तू जर सोबत आली नाही तर तुझी गावभर बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकणी अधिक तपास उपनिरीक्षक संगिता गिरी करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT