गुलाल टाकण्यावरून दोन मंडळांत दगडफेक; सात जखमी,१५ अटकेत file photo
छत्रपती संभाजीनगर

गुलाल टाकण्यावरून दोन मंडळांत दगडफेक; सात जखमी,१५ अटकेत

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलाल टाकण्यावरून दोन गटांत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावरून भांडण होताच तुफान दगडफेक झाली. यात सात जण जखमी झाले. जखमींनी पोलिसांत धाव घेत तक्रार केल्यावर जमावाविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ जणांना अटक केली आहे. शिवाजीनगरात रात्री साडेअकरा वाजता हा राडा घडल्याचे सांगण्यात आले.

आरती कारके, भारती कारके यांच्या पायाला तर संकेत देशमुखच्या डोळ्यावर दगड लागला. कृष्णा वाघच्या तोंडावर दगड लागून दात पडले. अजय मोटेच्या कान आणि डोक्यात दगड लागला. संघर्ष ढवळेला झेंड्याच्या काठीने मारहाण करण्यात आली. विलास देशमुखलाही दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी विलास देशमुखच्या फिर्यादीवरून ऋषिकेश मोटे, प्रमोद बोंद्रे, जॅकी यादव, अर्जुन राज- पूत, रवींद्र बुटे, राज पारवे आदींसह १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास देशमुख हा गुरुदत्तनगर, हनुमान मंदिराजवळील जय योगेश्वर गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे. त्यांनी विसर्जन मिरवणूक काढली होती.

त्यांची मिरवणूक जानकी हॉटेलसमोरून पाण्याच्या टाकीजवळ, शिव- ाजीनगर येथे गेली. तेथे त्यांच्या मागे हिंदू स्वराज्य नवयुवक गणेश मंडळ होते. ते एकमेकांवर गुलाल फेकत असताना संघर्ष ढवळेच्या डोळ्यात गुलाल गेला. त्यावरून समजावत असतानाच हिंदू स्वराज्य नवयुवक गणेश मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी तरुणांनी तुफान दगडफेक करायला सुरुवात केली. यो- गेश्वर गणेश मंडळाचे कार्यकर्ते बचाव करीत असताना दगडफेक करणारे पळून गेले. दरम्यान, जखमींवर उपचार केल्यानंतर या प्रकरणी पुंडलिकनगरात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात शांततेत विसर्जन

शहरात काही किरकोळ घटना वगळता गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. गुलमंडी भागातही गणेश मंडळ पुढे घेण्यावरून दोन मंडळांतील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. सिटी चौक पोलिसांनी त्यांना काही वेळ ताब्यात घेत नंतर त्यांची सुटका केली. मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्याची माहिती उपायुक्त बगाटे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT